श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित रसिकलाल एम धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीआणि साप्ताहिक पोलीस प्रवाह यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित रसिकलाल एम धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीआणि साप्ताहिक पोलीस प्रवाह यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

 पोलीस प्रवाह न्यूज 

पिंपरी चिंचवड : दि. ६ -  श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित रसिकलाल एम धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चिंचवड आणि साप्ताहिक पोलीस प्रवाह यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्रनिकेतचे प्राचार्य श्री अनिल थिटे यांनी केले.

पोलीस प्रवाहचे संपादक श्री नवनाथ कापले सर यांनी , पोलीस प्रवाह तर्फे वर्षभर चालू असणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली. या आरोग्य तपासणी शिबीराचे महत्व मुक्ताई स्पेसिलिटी क्लिनिक आकुर्डीचे डॉ. एस. के. टोके यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. श्री डेंटल केअर निगडीचे डॉ. श्रीकांत राव यांनी डॉक्टरांनी त्याचे कार्य करत असताना सामाजिक कार्य कसे जपावे याबद्दल माहिती दिली.  तर रेनबो क्लिनिकचे डॉ. श्रीकांत कासार यांनी  निरोगी राहण्यासाठी विद्यार्थ्यांना 5 नियम सांगितले.

   या आरोग्य शिबीरमध्ये डॉक्टरांनी फुफुस कार्यक्षमता, रक्तदाब, दन्तचिकित्सा तसेच इतर टेस्ट करण्यात करण्यात आल्या सोबतच शिक्षक व विद्यार्थी त्यांच्या शंकाचे निरसन केले. या आरोग्य तपासणी शिबीराचा सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तंत्रनिकेतचे प्राध्यापक श्रीराम खडके, आशिष जैन , सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या