उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे हिमोफिलिया डे-केअर सेंटर चालू
माणगांव-दि. २७- होमोटोलिजी कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात हिमोफिलिया डे-केअर सेंटर चालु करण्यात आले. सदर हिमोफिलिया डे-सेंटर चे अनावरण आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दुरदुष्य प्रणालीद्वारे दि. २६ फेब्रुवारी रोजी संपुर्ण महाराष्ट्रात केले. या प्रमाणे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे देखील हीमोफिलिया डे सेंटर चालु करण्यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे सिव्हील सर्जन डॉ. आंबादास देवामाने यांनी फित कापून हिमोफिलिया डे सेंटर चालु केले. या वेळी सिव्हील सर्जन डॉ. देवामने यांनी हिमोफिलिया या आजाराची लक्षणे काय असतात. त्यावर कोणते उपाय असतात यावर मार्गदर्शन केले. या सेंटर मध्ये मोफत औषध व उपचार होणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास सिव्हील सर्जन डॉ. देवामाने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गोमसाळे, डॉ. तुषार शेट, मेट्रोन लता राठोड, सर्व सिस्टर, फॅसिलिटी मॅनेजर, कर्मचारी आणि हिमोफिलीया पेशंट उपस्थित होते.



0 टिप्पण्या