धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका वाढतोय - डॉ. एस के टोके

धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका वाढतोय - डॉ. एस के टोके

पोलीस प्रवाह न्यूज 

 पिंपरी चिंचवड : दि. २४ - धूम्रपान, मद्यपान व बदलती जीवनशैली कर्करोगाला निमंत्रण देत आहे. जगात दुसरे सर्वाधिक मृत्यू कर्करोगाने होत असल्याचे समोर आले आहे. त्यात गर्भाशय, स्तनाचा कर्करोग अधिक असून, त्यापाठोपाठ पोटाच्या कर्करोगाचा समावेश आहे. लक्षणे आढळून येताच तत्काळ उपचार घेतल्यास दिलासा मिळू शकतो, असा दावा आयएमएने केला आहे.

४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोक दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात या रोगाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगभरात मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण हे कर्करोगाचे आहेत. दरवर्षी जवळपास १० दशलक्ष लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. २०३० पर्यंत यात वाढत होऊन १३ दशलक्ष होणार असल्याची भीती आयएमने व्यक्त केली.

भारतातही या आजारावर चिंता व्यक्त केली जात आहे. कर्करोगातील अनेक रुग्ण आणि कॅन्सर पीडित व्यक्ती अपंगत्व किंवा काही प्रतिबंध आणि खबरदारी घेऊन जीवन जगतात. धूम्रपान आणि मद्यपान हे भारतात जास्त असू शकते त्यातूनच हा आजार बळावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे आयएमएने म्हटले आहे.

 तंबाखू, धूम्रपानाची सवय टाळावी.

निरोगी आहार, सक्रिय राहावे, हालचाल वाढवावी, तंबाखू किंवा धूम्रपानाची सवय टाळा, कडधान्ये, फळे, भाज्या आणि कडधान्यांमध्ये भरपूर आहार घ्या, उच्च प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त्त पेये यांचा आहारात समावेश करू नका, कर्करोग लक्षणे, चिन्हे आणि त्यावर कृती जाणून घ्यावी, असे आवाहन आयएमएच्या श्वसन विकार व कॅन्सर प्रतिबंध कमिटीचे संयोजक डॉ. एस के टोके ( मुक्ताई स्पेशालिटी क्लिनिक )यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या