इंदापूर विभागात विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही- ना. अदिती तटकरे

 इंदापूर विभागात विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही- ना. अदिती तटकरे

रुद्रवली येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १४- तालुक्यातील इंदापूर विभागाला विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री ना. अदिती तटकरे यांनी रुद्रवली येथे पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.

दि. १३ फेब्रुवारी रोजी पोटणेर ग्राम पंचायत हद्दीतील मौजे रुद्रवली येथे व्यायामशाळा, महामार्ग ते रुद्रवली रस्ता डांबरीकरण, बैठकीच्या हॉलकडे जाणार रस्ता, गणेश मंदिर रस्ता, गणेश मंदिर सभागृह, वाढवण ते रुद्रवली रस्ता, गणपती विसर्जन घाटपायऱ्या आदी विकासकामांचा लोकार्पण सोहळा ना. अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, जेष्ठ नेते काका नवगणे, ग्राम पंचायत भुवन सरपंच दिपक जाधव, तालुका महिला उपाध्यक्षा तथा ग्रा. पं. पोटणेर सदस्य श्रद्धा यादव, संतोष यादव, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, लक्ष्मण सांगले, संतोष सांगले, भारत यादव, कानू खामकर, अंबाजी खामकर, सुरेश खामकर, प्रशांत यादव, गणेश यादव, कृष्णा शिगवण, संदीप दांडेकर, विजय निकम, ग्राम पंचायत सदस्य वासंती सांगले, कांचन दांडेकर, स्वाती पांगारे, नंदा सांगले, माधुरी यादव, चंद्रभागा जाचक, बेबी निकम, शामल निकम,  इंदापूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, रुद्रवली ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी ना. अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, पोटणेर ग्राम पंचायत हद्दीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत करण्यात आली आहेत. लवकरच लोकसभा निवडणूक जाहीर होईल. या निवडणुकीत मतपेट्या भरून खा. तटकरेंना पाठिंबा देऊया. रुद्रवली गावात सदस्या श्रद्धा यादव यांच्या पाठपुराव्याने अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन श्रद्धा यादव यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या