गोरेगाव येथून सुमारे पावणेपाच लाखांचा ऐवज चोरी

 गोरेगाव येथून सुमारे पावणेपाच लाखांचा ऐवज चोरी


पोलीस प्रवाह न्यूज

गोरेगाव- दि. ८- गोरेगाव लगत मौजे चिंचवली येथील रंजना मंगेश लोखंडे यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत खिडकी वाटे येऊन कपाटातील सुमारे ४७२००० रु. चा ऐवज चोरी केल्याची घटना गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत घडली.

सविस्तर असे की, मौजे चिंचवली येथील रंजना लोखडे यांच्या घरातील दिनांक २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारीच्या दरम्यान सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी ४७२००० रू चा ऐवज चोरी केल्याची घटना घडली. यामध्ये लांब हार ९०००० रु., पट्टीचे मंगळसूत्र ९०००० रु., बांगड्याचे जोड ९०००० रु., काळे मणी दोन सरीचा मंगळसूत्र ४५००० रु., ब्रेसलेट ३०००० रु., आंगठी १२००० रु., कानातील कुडी जोड १२००० रु., दुसरे कानातील १२००० रु. , कानातील टॉप ९०००रु., कानातील वेल जोड १५००० रु., झुमके १८००० रु, अंगठी ८००० रु. व रोख रक्कम ४०००० असा एकूण ४७२००० रू चा  कपाटातील ऐवज चोरून नेला.

सदर घटनेची नोंद गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत करण्यात आली असून भा. द. वि. कलम ३८० नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सह. पोलीस  निरीक्षक श्री. सुर्वे यांच्या मार्गद्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रासकर व ठाणे अंमलदार पांडूरंग सानप हे करीत आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या