महाराष्ट्रात खासदारकीच्या ४८ जागा निवडून आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एल्गार
पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान करायचे आहे - अजितदादा पवार
लोकसभा निवडणुकीत रायगडची जागा राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची म्हसळयात घोषणा
पोलीस प्रवाह न्यूज
म्हसळा- दि. १७- ४३ कोटी रुपये खर्चाचे म्हसळा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपुजन सोहळा शनिवार दि. १७ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरीकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने खासदार सुनिल तटकरे, महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत म्हसळा शहरासाठी खास करून ४३ कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
अजितदादांनी मेळाव्यात महा युतीचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेत महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची साद घालताना मतदार संघाचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नसल्याचे आश्र्वासन दिले. तुमची आमदार,मंत्री आदिती तटकरे कामात खमकी असल्याचे उपस्थितांना निदर्शनास आणून दिले आणि करीत असलेल्या कामांची स्तुती केली.
खासदार सुनिल तटकरे अजितदादांच्या प्रशासन कोषल्याची स्तुती करताना राज्यात आणि मतदार संघात मोठमोठ्या विकास कामांसाठी निधीची उपलब्धता करून खास करून पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात आल्याने पर्यटकांची संख्या चार ते पाच पटीने वाढली आहे.दादांचा हात शुभ शकुनी आहे जो संकल्प केला तो सिद्धीस गेला.येत्या वर्षभरात या कामाचे उद्घाटन दादांचे हस्ते होईल असा विश्वास व्यक्त करताना पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल तेव्हा अजितदादांची नक्की नेतृत्व आणि भुमिका काय असेल हे माहीत नाही.घड्याळ तेच वेळ नवीन आणि विकासाचे नवीन अजित पर्व सुरु झाले असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगीतले.श्रीवर्धन मतदार संघात जाती पातीचे राजकारण करण्याचा कोण प्रयत्न करीत असेल तर श्रीवर्धनची जनता त्यांना माफ करणार नाही योग्य वेळी चोख उत्तर देईल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंत्री आदिती तटकरे यांनी करतांना आमचे प्रयत्न आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने म्हसळा शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ४३ कोटी रुपये मंजूर झाले त्याचे समाधान व आभार मानले.यावेळी आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यात नगर पंचायत कार्यालय आणि तहसीलदार प्रशासकीय इमारत बांधकामासाठी आवश्यक निधीची मागणी केली.
२००९ पासुन खासदार सुनिल तटकरे श्रीवर्धन मतदार संघाचे नेतृत्व करत असताना त्यांनी केलेल्या विकासाचे जोरावरच संपुर्ण मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला झाला आहे.या कार्यक्रमात म्हसळा नगर पंचायतीचे नगरसेवक, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष अनिकेत उर्फ मुन्ना पानसरे यांनी असंख्य सैनिकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांचे ना.अजितदादांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे स्वागत व आभार तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी केले.
◆ आमदार तथा महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विधानसभा मतदार संघात पक्षाचे राष्ट्रिय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हसळा नगरीत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन सोहळ्याला उपस्थित राहणार म्हणुन चार ते पाच दिवस आमदार अनिकेत तटकरे यांच्या निगराणीत त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती.
◆ म्हसळा शहरात नाका नाक्यांवर भव्य स्वागत कमान,स्वागत फलक आणि पक्षाचे झेंड्यानी संपुर्ण शहर राष्ट्रवादीमय करण्यात आला होता.
◆ जेसीबीच्या साह्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच ३५ फूट उंचीचा हार घालुन दिमाखदार सत्कार करण्यात आला.
● आयोजीत सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जिल्हा अधिकारी अलिबाग,जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे उपस्थितीत मानवंदना दिली.
#पोलिस ब्यांड पथकाच्या सुरेल महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.





0 टिप्पण्या