वडपाले सरपंचांसह ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीला खिंडार
माणगांव-दि. २- महाड विधानसभा मतदारसंघ लोणेरे पंचायत समिती गणातील वडपाले सरपंच ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत आ. भरत गोगावले यांच्या ढालकाठी या शिवनेरी निवासस्थानी जावून शिवसेनेत केला जाहीर प्रवेश केला. आपल्या गावचा विकास फक्त आमदार भरत गोगावले करू शकतात म्हणून वडपाले सरपंच कविता नरेश मोहिते यांनी अशोक शिंदे व गणपत शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वावर खाली असंख्य ग्रामस्थांना सोबत घेऊन राष्ट्रवादीला पक्षाला शेवटच रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला.
त्यांच्या समवेत वडपाले ग्रामस्थ दिलीप रमेश चव्हाण, राजेश्री अशोक शिंदे, रंजना रमेश पोळेकर, प्रियंका चव्हाण, स्मिता मनवे, संगिता शिंदे, अरुणा शिंदे, अस्मिता शिंदे, सुवर्णा मोहिते, दिपाली शिंदे, सुधाकर मोहिते, अशोक विठू शिंदे, भरत बापू शिंदे, नरेंद्र सुधाकर शिंदे, श्रीधर ल. शिंदे, ग्रामपंचायत सदस्य किसन शांताराम चव्हाण, रमेश पोळेकर, प्रकाश गंगाराम चव्हाण, बाळाराम दगडू शिंदे, सहादेव तुकाराम खापरे, पांडूरंग सहादेव शिंदे, बळिराम धोंडू शिंदे, रमेश गंगाराम चव्हाण, मंदा भरत शिंदे, दर्शना दशरथ चव्हाण, शुभांगी शिंदे, पुष्पा शरद शिंदे, रुक्मिणी बळिराम शिंदे इत्यादी महिला भगिनींसह वडपाले ग्रामस्थांनी आ. भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेश समारंभ वेळी उपस्थित तसेच या भागातील शिवसेना युवा संपर्क प्रमुख अरुण चालके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, संपर्क प्रमुख प्रताप घोसाळकर, विभाग प्रमुख रविंद्र टेंबे, उपविभाग प्रमुख शेखर घोसाळकर, दिलीप टेंबे, लोणेरे माजी सरपंच समाधान करकरे, शाखा प्रमुख भरत शिंदे, निलेश शिंदे, व वडपाले ग्रामस्थ पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ. गोगावले यांनी सांगितले कि, तुम्ही योग्य दिशेला आला आहात. त्यामुळे वडपाले गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच शिवसेनेत तुम्हाला योग्य मानसन्मान दिले जाईल असा शब्द प्रवेशकर्त्याना दिला.



0 टिप्पण्या