माणगांव उपजिल्हा रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका फोडली
माणगांव-दि. १२- रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण माणगांव असून या ठिकाणी उपचारासाठी रुग्णाची नेहमीच वरदळ असते. मात्र व्यवस्था डॉक्टरांची या बाबींची कमतरता नेहमीच भासत असते. तरीदेखील आरोग्य विभाग याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. नेहमी एखादा मोठा अपघात झाला किंवा एखादा गंभीर पेशंट आला तर त्याला उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे तात्पुरती उपचार प्रणाली वापरून पुढील उपचारासाठी मुंबई अलिबाग या ठिकाणी पाठवण्यात येते. तज्ञ डॉक्टरांचा अभाव व अपुऱ्या सोयी सुविधा यामुळे रुग्णांवर ही वेळ येत असते. मात्र यावेळी टोल फ्री क्रमांक १०८ व इतर खाजगी रुग्णवाहिकानी त्या रुग्णांना पुढील उपचारासाठी अलिबाग, मुंबई या ठिकाणी नेण्यात येते. मात्र १०८ रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याने एका व्याकिने चक्क १०८ रुग्णवाहिकेवर दगड फेक केली असल्याची घटना माणगांव उपजिल्हा रुग्णालय परिसरात दि. १२ जानेवारी रोजी सांयकाळच्या दरम्यान घडली आहे.
माणगांव उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी, सुविधांचा तुटवडा, अपुरी वैद्यकीय सेवा याबाबत माणगांव तालुक्यातील नागरिक संतप्त आहेतच. मात्र आता त्या संतप्त भावनांचे पडसाद देखील उमटण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा माणगांव तालुक्यात सुरू असून याकडे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी माणगांव तालुक्यातील सुजाण नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.



0 टिप्पण्या