शिक्षित तरूणाने धरली शेतीची कास
अगस्त, सुप्रीत, जन्नत ,सिंबा या चार जातीच्या कालिंगड लागवड
पिक सर्व परदेशांत विकले
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव- दि. १७- भाताचे कोठार अशी कृषी क्षेत्रात ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील मातीत मेहनत घेतली तर फळे देखील रसाळ येऊ शकतात हे एका शिक्षित तरूणाने दाखवून दिले आहे. या तरुणाने केवळ मेहनत घेऊन ९ एकर शेत जमिनीतून कलींगडचे पिक घेऊन रोहन साळवी लाखो रू कमविले आहे.
माणगाव तालुक्यातील गोरेगाव मधील रोहन साळवी या ३५ वर्षीय तरुणाने अवघ्या महिनाभरात येथे कलिंगड चा मळा फुलवला. ९ एकर जमिनीवर त्याने अगस्त, सुप्रीत, जन्नत, सिंबा या चार प्रजातीचे कलिंगड पिकाऊन आपला मला फुलावला असुन रोहन थांबला नाही. त्याच्या पिकास चांगला भाव मिळावा म्हणून त्याचे पिक एक्सपोर्ट केला.
या तरुणाने अद्यावत शेतीची कास धरली असुन एखाद्या सरकारी नोकरदारला लाजवेल अशी शेती करून आपले चांगले अर्थार्जन केले आहे. रोहन साळवी याने दिवस रात्र मेहनत घेत अगस्त, सुप्रीत, जन्नत, सिंबा या चार जातीच्या कालिंगडची विक्री परदेशात केली. परदेशात विक्री करण्यास रोहनला पनवेलचे व्यापारी जयदेव वावेकर यांनी मदत केली. या शेतीत कलिंगडचे भरघोस पिक आल्याने त्याचा समाधान साळवी कुटुंबाला सुखावत आहे.
कोकणात बारकाईने पाहिले तर चांगला मोबदला मिळत असेल तर जमीन, शेत जमीन विकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पैशांच्या हव्यासा पोटी विकली गेलेली शेतीच नष्ट होत असल्याने तरुणाई देखील नोकरीसाठी शहरांची वाट धरत आहेत अशात रोहन साळवी सारख्या युवकाने शेती कडे टाकलेले पाऊल आजच्या पिढीसाठी प्रेरणादायीच म्हणावे लागेल.




0 टिप्पण्या