“शिवराय मावळे प्रतिष्ठान, आबलोली” यांचे प्रजासत्ताक दिनी गोपाळगड किल्ल्यावर ध्वजारोहण
चिपळूण- दि. २७-अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांचे वतीने ३५० वा “शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा” २६ जानेवारी २०२४ रोजी सर्व शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यांनी एकाच दिवशी, एकसंघपणे ३५० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि भगवा, तिरंगा ध्वज फडकविण्याची जबाबदारी शिवप्रेमींनी घेतली होती. रत्नागिरी जिल्हात एकूण २६ किल्ल्यांवर उपक्रम पार पाडला गेला. यामध्ये चिपळूण-गुहागर विभागात शिवराय मावळे प्रतिष्ठान, आबलोली यांनी अंजनवेल मधील गोपाळगड किल्यावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि भगवा, तिरंगा ध्वजारोहन यशस्वीपणे पार पाडला.
यावेळी अंजनवेल ग्रामपंचायत सरपंच सोनल मोरे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीयध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर सर्वांनी ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान गायले गेले. प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष नितेश सुरेश पांचाळ यांच्या शुभहस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर सर्व मान्यवर, प्रतिष्ठान सदस्य यांच्या उपस्थितीत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून सर्वजन नतमस्तक झाले. उपस्थितांच्यासमोर गडकिल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवेन, स्वराज्याचा सोनेरी इतिहास समजून घेईन, किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा करणार नाही अशी शिव प्रतिज्ञा घेण्यात आली.
या उपक्रमासाठी अंजनवेल ग्रामपंचायत यांची उपस्थिती व सहकार्यासाठी सरपंच सोनल मोरे यांचे प्रतिष्ठान वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सरपंच सोनल मोरे यांनी मनोगतामधून प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संस्थापक अध्यक्ष नितेश पांचाळ यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास प्रकट केला, आधुनिक जगात जीवन जगत असताना आपले विचार कसे असावे व कर्तव्य काय आहे हे समजावून सांगितले व प्रतिष्ठानचे शैक्षणिक, सामाजिक कार्य प्रकट केले. आणि शेवटी सर्वांचे आभार मानून उपक्रमाची सांगता केली.
यावेळी अंजनवेल ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनल मोरे, सदस्य नंदकुमार घेतले, योगेश धामणस्कर, वहिदा खतीफ, सानिका नरवणकर, सैतावडेकर मॅडम, किल्ला जागा मालक ताबिश मणियार, प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष नितेश सुरेश पांचाळ, शुभम मनोहर पांचाळ, प्रथमेश रमेश पांचाळ, सचिन घाणेकर, ऋषीकेश रविंद्र पांचाळ, विनीत सुभाष पांचाळ, प्रणव प्रकाश झगडे, सुबोध विलास जाधव, विक्रम विठ्ठल घाणेकर, शुभम साळवी, पंकज कदम आदी शिवराय मावळे प्रतिष्ठान, आबलोली या प्रतिष्ठानचे मावळे व शिवप्रेमी उपस्थित होते.



0 टिप्पण्या