२७,२८ जानेवारी रोजी गुहागर तालुक्यात हळदी कुंकू समारंभाचे आयोजन
कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर आणि गुहागर तालुका कुणबी नागरी सह.पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम
पोलीस प्रवाह न्यूज
गुहागर- दि. २७- कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर (मुंबई व ग्रामीण) आणि गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आबलोली, शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद गुहागर गट, पालशेत गट, हेदवी गट आणि तवसाळ गटात सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पतसंस्थेच्या महिला भीगीनी सभासद, आणि हितचिंतक महिलांसाठी तसेच गुहागर बाजाराच्या (शृंगारतळी शाखा व तळवली शाखा)महिला सभासद, महिला ग्राहक आणि हितचिंतक महिलांसाठी शनिवार दि. २७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद तवसाळ गटातील महिलांसाठी आबलोली येथे गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात सकाळी ११:०० ते २:०० या वेळेत आणि हेदवी गटातील महिलांसाठी दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद पालशेत गटातील महिलांसाठी सकाळी ११:०० ते २:०० या वेळेत गुहागर बाजार शृंगारतळी येथे आणि गुहागर गटातील महिलांसाठी गुहागर बाजार शृंगारतळी येथे दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून महिला सभासद भीगीनी, ग्राहक महिला भीगीनी आणि हितचिंतक महिलां भगीनींनी हळदी कुंकू समारंभाचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर मुंबई व ग्रामिण अध्यक्ष, सरचिटणीस व सर्व पदाधिकारी आणि कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आबलोली, शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी यांचे चेअरमन ,व्हा.चेअरमन व सर्व संचालक,संचालिका तसेच गुहागर गट, पालशेत गट, हेदवी गट तवसाळ गट, मध्यवर्ती युवक मंडळ युवक मंडळ यांचे अध्यक्ष सरचिटणीस सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळ यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.



0 टिप्पण्या