प्रदिप तुकाराम आडीत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 प्रदिप तुकाराम आडीत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि. ७- तालुक्यातील खरवली गावचे सुपुत्र प्रदिप तुकाराम आडीत यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगड तर्फे महाड, पोलादपूर, माणगांव आ. भरत गोगावले व ठाणे जिल्हा आ. संजय केळकर यांच्या हस्ते दि. ६ जानेवारी रोजी 'आदर्श शिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगड यांचा दिनदर्शिका प्रकाशन व पुरस्कार सोहोळा गोरेगाव येथे पार पडला. दि. ८ जुलै १९९४ रोजी म्हसळा तालुक्यातील रा. जि. प. चिखलप शाळेतून ते शिक्षण खात्यात रुजू झाले. तेथे त्यांनी चार वर्षे विद्यार्थी घडविण्याचे काम अत्यंत उत्कृष्टरित्या केले. १९९८ ते २०११ पर्यंत त्यांनी रा. जि. प. शाळा सुरव/निजामपूर येथे काम केले. त्यानंतर २०११ ते २०२३ या कालावधीत त्यांनी जि. प. शाळा. उमरोली/खरवली येथे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. आज ते सुरव/निजामपूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रदिप आडीत यांनी शिक्षण खात्यात केलेल्या २९ वर्ष कारकिर्दीत शेकडो विध्यार्थी घडविले. त्यांचे बहुतांश विद्यार्थी हे उच्च पदावर कार्यरत आहेत. प्रदिप आडीत यांनी काम केलेल्या शाळेतील गावकरी आजही त्यांना प्रेमाने हाक मारतात. विद्यार्थी घडविण्यासोबत त्यांनी आयुष्यात प्रेम, आदर व माणूसकी जपली. उमरोली/खरवली येथील जि. प. शाळेच्या सुशोभीकरणात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो या नात्याने ते कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेकांना या माध्यमातून सहकार्य केले आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर नातेवाईक, मित्र परिवार व संपूर्ण माणगांव तालुक्यातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या