मांजराच्या हाती लोण्याचा गोळा... भाजपचा रायगड लोकसभेवर डोळा..?

भाजप चा श्रीवर्धन विधानसभा व महाड विधानसभा बूथ कार्यकर्ता मेळावा.

रायगड चा भावी खासदार नक्की कोण असणार भाजप चा अजूनही धैर्यशील पाटील यांच्याच नावाचा गवगवा.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : ८ -  महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथा-पालथी झाल्यानंतर सध्या महाराष्ट्र राज्यात ३ पक्ष म्हणजे शिवसेना (शिंदे गट) ,राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपा अश्या पक्षांचे सरकार अस्तित्वात आहे,आणि या पक्षांनी आगामी निवडणूका देखील एकत्र लढविण्याची तयारी दर्शवली असली तरी रायगड जिल्ह्यात मात्र वेगळे चित्र पहावयास मिळत आहे.इथे स्टँडिंग खासदार सुनिल तटकरे हे महायुती मध्ये सामील असताना देखील भारतीय जनता पार्टी ने पुन्हा एकदा रायगड लोकसभा जागेला लक्ष्य करत माजी आम. धैर्यशील पाटील यांच्या खासदारकी उमेदवारीची मागणी करत.जागावाटपाचा तिढा जागा वाटपाअगोदरच समोर आणला आहे.माणगांव तालुक्यात झालेल्या भाजप च्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात पुन्हा एकदा हे चित्र स्पष्ट झाले आहे की तटकरे यांच्या खासदार की उमेदवारीला भाजप असलेला विरोध पुन्हा उघड झाला आहे.पण कोकण ची जबाबदारी असलेले भाजप नेते मंत्री रविंद्र चव्हाण यांचे व खासदार तटकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामूळे ही जागा भाजप ला मिळेल का? अश्या चर्चेसोबतच "मांजराच्या हाती लोण्याचा गोळा..आणि भाजप चा रायगड लोकसभेवर डोळा ??.अशी चर्चा देखील जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे.


      भारतीय जनता पार्टी चा श्रीवर्धन विधानसभा आणि महाड विधानसभा मतदारसंघाच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा ८ जानेवारी रोजी माणगांव शहरातील एकता पेट्रोलपंपा शेजारील पटांगणात पार पडला या कार्यक्रमाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण,आ. रविंद्र पाटील, रायगड लोकसभा निवडणुक प्रमुख सतिष धारप ,जिल्हाध्यक्ष मा.आ. धैर्यशील पाटील,प्रदेश सरचिटणीस रवी मुंढे,जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुण कर,उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, महिला मोर्चा राज्य उपाध्यक्ष हेमा मानकर, युवा मोर्चा द रायगड अध्यक्ष निलेश थोरे,मा.जिल्हा अध्यक्ष ऍड महेश मोहिते,श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे,मा.तालुका अध्यक्ष संजय (आप्पा)ढवळे, तळा तालुका अध्यक्ष ॲड निलेश रातवडकर,जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा,सोपान जांभेकर,नाना महाले,माणगांव तालुका सरचिटणीस युवराज मुंढे,गोविंद कासार, व दोन्ही विधानसभा क्षेत्रातील विविध सेल आणि प्रकोष्ठ चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात विशेष करून रायगड च्या खासदारकीच्या उमेदवारी विषयी अधिक बोलणे व्यासपीठावरील नेत्यांनी पसंत केले .पेण चे आ.रविंद्र पाटील म्हणाले की,पक्षाने खासदारकीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा दिल्यास पेण विधानसभा मतदारसंघातुन ५० हजारापेक्षा अधिक मतांची आघाडी ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आम्ही निश्चितपणे देऊ.तसेच आपल्या भाषणात खासदारकीचे उमेदवार भाजप द.रायगड अध्यक्ष मा.आ. धैर्यशील पाटील म्हणाले की, विकास खऱ्या अर्थाने होत असताना तो दबक्या पावलांनी होत असतो विकास होताना स्थानिक लोकांचे विस्थापन होता कामा नये.येथील स्थानिक नागरिक हा इथेच सहकुटुंब राहिला असा विकास करण्याचा प्रयत्न नक्कीच आमच्याकडून राहील तसेच पक्ष जो निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील तो शिरसावंद्य असेल .यावेळी महाड तालुक्यातील अनेक मुस्लिम बंधू व महिला भगिनी तसेच रोहा माणगांव श्रीवर्धन तळा तालुक्यातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी नाम.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजप मध्ये प्रवेश केला.

      मात्र सध्या स्थानिक खासदार  सुनिल तटकरे हे महायुतीत असले तरीही ह्या रायगड लोकसभा जागेवर  ठिकाणी सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष कसा दावा करत आहे? यामुळे रायगड जिल्ह्यातील मतदार राजा बुचकळ्यात पडला आहे.यामुळे महायुती राहणार की ,महायुती राहुन देखील ही जागा भाजप च्या पदरात पडणार अश्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या बूथ कार्यकर्ता कार्यक्रमात बोलताना मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला विकास तसेच महाराष्ट्र राज्यसरकार करत असलेला विकास यांचे अनेक दाखले देत स्तुती सुमने उधळली मात्र सार्व.बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी खासदार तटकरे यांच्या विरुद्ध बोलणे किंव्हा बाजूने बोलणे टाळले आहे.व लोकसभा जागावाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या