माणगांवात अज्ञात इसमाचा वडाच्या झाडाला गळफास
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. ६- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वडाच्या झाडाला अज्ञात इसमाने गळफास घेतल्याची घटना घडली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ६ जानेवारी रोजी मुंबई गोवा महामार्गालगत माणगांव रेल्वे स्टेशनच्या पुढे माणगांवकडून इंदापूर बाजूकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाला सुमारे दुपारी ३ ते ४.३० वा. च्या दरम्यान अंदाजे वय ३० ते ४० वर्ष अज्ञात इसमाने झाडाला गळफास घेतले असल्याचे निदर्शनास आले. वडाच्या झाडाच्या फांदीला पांढरा कपडा बांधून त्याला कंबरेच्या पट्याच्या सहाय्याने गळफास घेतला होता. मृत इसमाचे हात बांधलेल्या अवस्थेत होते. ही बातमी समजताच पो. नि. राजेंद्र पाटील व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. दोरीच्या सहाय्याने झाडाला लटकलेले प्रेत खाली काढण्यात आले. त्यावेळी तपासणी केली असता मृत इसमाच्या खिशामध्ये आधार कार्ड मिळाले असून त्याचे नाव प्रफुल टप्पो, रा. झारखंड असे समजले आहे. सदरची बातमी कळताच बघ्यांनी एकच गर्दी केली होती. नक्की हा प्रकार काय घडला याचा पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस करीत आहेत.



0 टिप्पण्या