शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आमचा राज्यकारभार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
२२ जानेवारीला मंदिराच नाही, तर आमच्या अस्मीतेचे उद्घाटन आहे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जमिनी विकू नका आहे त्या जमिनीवर उद्योग सुरु करा - उपमुख्यमंत्री अजित पवार
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव- दि. ५- छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा राजा म्हणून आदर्श राज्य कारभार केला. तोच आदर्श डोळ्यापुढे ठेवून आमच्या सरकारचा राज्यकारभार सुरु असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले .
२२ जानेवारीला अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे उद्घाटन होत आहे. हे केवळ मंदिराचे उद्घाटन नाही तर आमच्या अस्मीतेचे उद्घाटन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर आमचे सरकार कोकणातील जनतेसाठी उद्योग आणत आहे. तुम्ही तुमच्या जमिनी विकू नका. आहे त्या जमिनीत उद्योग सुरु करा असे आवाहन उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी केले.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यपिठात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात हे तिघे मान्यवर बोलत होते. यावेळेस रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, महिला व बाल कल्याण मंत्री ना. अदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आ. भरतशेठ गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, आ. अनिकेत तटकरे, आ. प्रशांत ठाकूर, आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार धैर्यशिल पाटील, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोक घरात बसून काम करतात पण आम्ही लोकांच्या दारात येवून त्यांची कामे या शासन आपाल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत. या माध्यमातून आमच्या डबल इंजीन सरकारने रायगड जिल्हयातील २६ लाख लोकांना १७०० कोटी रुपयांचे लाभ मिळवून दिले. इतके वेगवान निर्णय आमच्या सरकारने घेतले. इतका भव्य कार्यक्रम पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमावर टीका करतात. पंतप्रधान मोंदीच्या नेतृत्वाखाली देशात व राज्याचा कारभार गतिमान झाला आहे. गेल्या ५० ते ६० वर्षात जे झाले नाही ते नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात करून दाखविल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेली ५० वर्षे महाराष्ट्राचा विकास मुंबईतून झाला. पण आता पुढील २५ वर्षे राज्याचा विकास हा कोकणातून होईल असा विश्वास व्यक्त करित आता डे टा महत्वाचा आहे. ६५ टक्के डे टा कॅपॅसिटी ही रायगड व मुंबईतून होत आहे. त्यामुळे इथे पायाभूत सुविधा उपलव्ध करताना जेएनपीटी दिघी पोर्ट हे इको प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करून रायगडचे चित्र बदलेल असा विश्वास श्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
अजित पवार म्हणाले की, रेवस रेड्डी जेटीचे काम सरकारने हाती घेतले आहे. रोरो सेवा असो वा रेवस रेड्डी जेट्टी असो या माध्यमातून कोकणचा विकास करू असे सांगून कोकणातच रोजगाराच्या संधी निर्माण करू. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि त्यांना गावाबाहेर जावे लागणार नाही. याउलट रोजगारासाठी बाहेर गेलेले लोक कोकणात पुन्हा येतील. कोकणातील जनतेने आमच्या पाठिशी राहवे विकासाची कमी पडू देणार नाही असा विश्वास व्यक्त करताना श्री. पवार यांनी रायगडपासून तिसरी मुंबई अस्तित्वात येत आहे. तेव्हा इथे नवनवीन प्रकल्प येवून रायगडचा विकासात्मक कायापालट होईल असे सांगितले. विरोधकांना आमच्या कामाची पोटदुखी आहे म्हणून ते कोकणात येणाच्या प्रकल्पाल विरोध करतात असेही ते यावेळी म्हणाले.
ना . उदय सामंत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी प्रास्तविक केले.
दरम्यान या कार्यक्रमा पूर्वी तंत्रशास्त्र विद्यापिठ परिसरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. तर तळीचे दरडग्रस्तांच्या ६६ घरांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच २५ लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले.







0 टिप्पण्या