रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा प्रवक्ते दिवंगत अनंतराव पवार यांच्या प्रथम स्मृती दिनाचे २८ रोजी शीर येथे आयोजन
गुहागर- दि. २४- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे निस्वार्थी समाज सेवक अन्याया विरुद्ध पेटून उठून अनेक आंदोलने, उपोषणे यशस्वी करून सर्व समाजाला न्याय देणारे व गुहागर तालुक्यातील शीर गावचे सुपुत्र आणि शीर गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे शीर विवीध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व बौध्दजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे माजी विश्वस्त, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या राजकीय पक्षाचे जिल्हा प्रवक्ते दिवंगत अनंतराव विठ्ठल पवार यांचा प्रथम स्मृतिदिन, धम्म संस्कार आणि आदरांजली सभा असा संयुक्त कार्यक्रम रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता गुहागर तालुक्यातील शीर बौद्धवाडी येथील दिवंगत .अनंतराव पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबीयांनी आणि बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर शाखा शीर क्रं.४८ (स्थानिक - मुंबई) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)तालुका गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून दिवंगत अनंतराव विठ्ठल पवार यांना प्रथम स्मृती दिनी अभिवादन करण्यासाठी बहूजन समाजातील जनतेने वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन अस्मिता अनंतराव पवार(पत्नी), .संतोष पवार(पुतण्या),.स्वप्नाली पवार,.पुनम पवार, अक्षता पवार (मुली) यांनी प्रशिद्धी पत्रकाव्दारे केले आहे



0 टिप्पण्या