प्रवीण अवचर यांना पत्रकार संघा तर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार

 प्रवीण अवचर यांना पत्रकार संघा तर्फे आदर्श पत्रकार  पुरस्कार



पोलीस प्रवाह न्यूज 

 दि ,21 जानेवारी रोजी करमाळा तालुका पत्रकार संघातर्फे जिल्हास्तरीय पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्यसैनिक  नरसिंह आप्पा चिवटे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते दैनिक लोकमतचे संपादक श्री संजय आवटे सर , ज्येष्ठ संपादक श्री राजा माने ,पिंपरी चिंचवडचे सकाळ चे निवासी संपादक जयंत जाधव ,ह.भ.प डॉ.  बाबुराव हिरडे, विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे , शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे , ऍड शिरीष लोणकर , डॉ -कोमल शिर्के ,धनंजय मोरे, विनायक दीक्षित , प्रताप जगताप  संतोष वारे, ऍड राहुल सावंत ,मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मंगेश चिवटे,  राजेंद्र बारकुंड. पत्रकार संघाचे सचिव नाशिर कबीर, जयंत दळवी ,आदी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचे सन्मान करण्यात आले.

यामध्ये आदर्श पत्रकार म्हणून  दै कृषी सहकार प्रवीण अवचर, दिव्य मराठीचे शेखर स्वामी , संघर्ष न्यूजचे सिद्धार्थ वाघमारे, टीव्ही नाईन चे शीतलकुमार मोटे ,तेजवार्ताचे  विशाल परदेशी, जनमतचे सचिन जवेरी, यांना शाल, श्रीफळ सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले..

यावेळी उपस्थित मान्यवरांनी  बदलती पत्रकारिता व पत्रकारांना कायदे विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले  या कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार संघाचे अध्यक्ष महेशदादा चिवटे,  यांनी केली,  सूत्रसंचलन किशोरकुमार शिंदे सर यांनी केले तसेच पत्रकार .अश्पाक  सय्यद नासिर कबीर, अशोक नरसाळे , सूर्यपुजारी सचिन जवेरी , बाळासाहेब भिसे , प्रफुल दामोदरे सचिन हिरडे , आदींनी विशेष परिश्रम घेतले, उपस्थित सर्व पत्रकारांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी करमाळा तालुक्यातील पत्रकारांसह जामखेड ,इंदापूर कुर्डूवाडी, माढा ,परंडा मोडनिंब ,सांगोला, येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार ज्येष्ठ पत्रकार अशोक नरसाळे यांनी मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या