आर पी आय (A) गटाच्या वडूज येथील बैठकीत विविध महत्वपूर्ण निर्णय व नवनियुक्त पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
सातारा- दि. १९- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने घेण्यात आलेली सातारा जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक पार पडली. हीबैठक वडूज येथे दि. १८ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह मध्ये झाली. झालेल्या बैठकीत आगामी निवडणूक लोकसभा निवडणूक संदर्भात काही मुद्दे मांडण्यात आले. तसेच काही नवनियुक्त पद नियुक्ती करण्यात आल्या. व काही जणांचे पद कमी करण्यात आले. सदर बैठक पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे (डॅडी)यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजीराव सर्वगोड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आरटीसीलचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, सातारा जिल्हा युवक सचिव अनिल उमापे, कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी, सुनील ओव्हाळ, अनिल ओव्हाळ, अतुल गरड, माण तालुका अध्यक्ष सनी खरात, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले व काही नवीन पद नियुक्ती करण्यात आल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खटाव तालुका कार्याध्यक्ष सुनील मिसळ यांचे पद काही कारणास्तव जिल्हाध्यक्षांच्या आदेशाने रद्द करण्यात आले. यांच्याजागी खटाव तालुका कार्याध्यक्ष हे पद सचिन भंडलकर यांना देण्यात आले आहे. तसेच रोहित भिलारे यांची खटाव तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विजय यादव यांची खटाव तालुका सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आघाडी खटाव तालुका कार्याध्यक्ष पदी ज्योती यादव यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खटाव तालुका युवक अध्यक्षपदी अमोल बुधावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत भोडवे यांची वडूज शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगेश माने यांची खटाव तालुका कोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक पाटोळे यांची कोरेगाव तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सचिन आगरकर यांची खटाव तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पार्टीचे आरटीसीएलचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी दिली.
तसेच सनी विठ्ठल कमाने याची सातारा जिल्हाअध्यक्ष यांचे आदेशानुसार पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे. अशा पद्धतीने सर्व पक्षाची बांधणी करण्यात आली आहे .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्टीचे कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी केले. पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सर्वगोड सर यांनी आभार मानले.




0 टिप्पण्या