कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ यांच्यावतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

 कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ यांच्यावतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

पोलीस प्रवाह न्यूज

महाड- दि. १- कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ रायगड रत्नागिरी (रजि.) यांच्या वतीने दि.३० डिसेंबर  रोजी श्रीकाशीविशेश्वर मंदिर दादली महाड येथे मंडळाची दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आली. तसेच मंडळाच्या वतीने शक्तीतूरा लोककलेत आपले अमूल्य आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शाहिरांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये भानुदास घराणे - केशवबुवा गुलगुले, संभुराजू घराणे - प्रल्हादबुवा शिरशिवकर, ताडदेव घराणे - बाळकृष्णबुवा भोस्तेकर, सदालाल घराणे - शंकर बुवा तुर्डे, भानुदास घराणे - चिमाजी बुवा बोर्ले, शंकर बुवा फणसे यांना जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

यावेळी कलगीतुरा समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश  महाबळे, कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळाचे अध्यक्ष राम टेंबे, संभुराजू तुरेवाले सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रमेश घडवले, कोकण सांप्रदाय सांस्कृतिक कला मंडळ महाड अध्यक्ष रमेश जाधव, लोककला मराठी शाहीर परिषद अध्यक्ष संदीप म्हस्के, मंडळाचे सचिव अंकुश जाधव, संचालक किसन बाटे, सहदेव उत्तेकर, वामन बैकर, विश्वास रेणोसे, नथुराम पाष्टे, कृष्णा शिंदे, रामचंद्र म्हात्रे, रवींद्र उमासरे, रामचंद्र भोस्तेकर, सुनील शिगवण, पांडुरंग पवार, एकनाथ मांढरे, उपसमिती अध्यक्ष संतोष भात्रे सर, सचिव अभिजित गोलांबडे, खजिनदार दीपक भोस्तेकर, दोन्ही मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सभासद व रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील शक्तीतूरा क्षेत्रातील अनेक नामवंत, प्रसिद्ध शाहीर, कलाकार, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. यावेळी शिवचैतन्य तमाशा मंडळ मूर यांनी भेदिक तमाशा व ज्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला अशा नामांकित गुरुवर्यांच्या जीवन कथेवर आधारीत गीत गाऊन आलेल्या रसिकजनाचे मनोरंजन केले. यावेळी शाहीर  नामदेव बाबू भोस्तेकर यांनी त्यांच्या शाहीर रुपी कलेमधून भेदिक सादर केली. त्यांना मूर गावचे ढोलकीपट्टु अशोक बालोजी भोस्तेकर व कोरस शाहीर दिपक सह दिपक व मंडळी यांनी साथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या