अयोध्या अक्षता कलशाचे श्री रामोत्सव समितीकडून गोरेगाव नगरीत स्वागत.
माणगांव-दि. ४- श्री राम जन्मभूमी "अयोध्या नगरीमध्ये" भगवान श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा "श्री राम नवमी" मुहूर्तावर दि. २२ जानेवारी रोजी साजरा करण्यात येत आहे. याकरिता अवघ्या देशभरातून प्रवास करत निघालेल्या भव्य अक्षता कलश यात्रेचे माणगांव तालुक्यातील "गोरेगाव नगरीत " आगमन झाल्यानंतर "श्री रामोत्सव समिती गोरेगाव यांच्या कडून अक्षता कलश यात्रेचे दि. २ जानेवारी रोजी जंगी स्वागत करण्यात आले.
ही अक्षता कलश यात्रा श्री राम मंदिर लोणेरे श्री विष्णू मंदिर गोरेगाव अशी काढण्यात आली. यावेळी रामोत्सव समिती गोरेगावकडुन अक्षता कलशाची पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी रामोत्सव समितीचे सदस्य भालचंद्र (नाना ) महाले, युवराज मुंढे, अशोक यादव, निलेश राशीनकर, नारायण भट्ट, सुनिल सहस्त्रबुद्धे, किशोर भोसले, मनोज कामत, चंद्रकांत गोरेगावकर, कन्हैय्या मेहता आदी उपस्थित होते.



0 टिप्पण्या