थर्टी फस्टच्या रात्री माणगांव मधील महादेव सॉ मिल मध्ये चोरी

 थर्टी फस्टच्या रात्री माणगांव मधील महादेव सॉ मिल मध्ये चोरी

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १- माणगांव मध्ये बंद घरे फोडणे, भुरट्या चोऱ्या ह्यांचे प्रमाण तसेच शहराचा विकास आणि विस्तार जस-जसा होत आहे, त्या प्रमाणे ह्या चोऱ्यांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. अशीच चोरी दि. ३१ डिसेंबरच्या रात्री माणगांव बामणोली रोडवरील महादेव सॉ मिल( लाकडाची गिरणी) ऑफिस फोडून झाल्याची घटना घडली आहे.

 याबाबत सॉ मिल मालकांशी प्रत्यक्षात चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, थर्टी फस्टच्या रात्री सुमारे ३ ते ३:३० वाजण्याच्या सुमारास ऑफिस च्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटुन ऑफीस मधील गल्ल्यामध्ये असणारे सुमारे १५००/- रोख रक्कम व चिल्लर तसेच कपाटाचा लॉक तोडून त्यातील पर्स मध्ये असणारे कार्ड व कागदपत्रे व सी सी टीव्ही कॅमेरा उखडून त्याचे काही भाग देखील ह्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहेअशी प्राथमिक माहीती समोर आली आहे.

यामुळे पान टपऱ्या, बंद घरे ,फोडण्यानंतर या भुरट्या चोरांनी आता आपला मोर्चा सॉ मिल कडे वळविला आहे का? अशी चर्चा माणगांव मध्ये सध्या जोरात सुरू आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या