गोरेगाव विभागात शासनाची रॉयल्टी बुडवून वाळू धंद्याना उधाण.
गोरेगाव पोलिसांची धडक कारवाई ११ लाखांचा मुद्देमाल जप्त.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. ३१- तालुक्यातील गोरेगाव विभागात सावित्री नदी खाडी परिसरात शासनाची रॉयल्टी बुडवून अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे व अवैध वाळूची वाहतुक होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. यामध्ये माणगांव पोलीस ठाणे अंतर्गत गोरेगाव पोलिसांनी अशा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करत वाहनासहित सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना दि. ३० डिसेंबर रोजी गोरेगाव विभागात घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दिनांक ३० डिसेंबर रोजी ३ वाजण्याच्या सुमारास पुरार (नांदवी) गावच्या हद्दीत म्हसळा रोड बाजूकडे घटनेतील आरोपीत शादाब जमीर डावरे रा.आंबेत हा आपल्याला ताब्यातील आयशर टिपर (टेम्पो) एम एच ०६ बी डब्ल्यू ५८७६ यामध्ये ५२००/- किंमतीची सुमारे १:३०ब्रास रेती (वाळू )शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी (रॉयल्टी)नसताना भरून लबाडीच्या हेतूने स्वतःच्या फायद्याकरिता घेऊन जाताना मिळून आला आहे.
या प्रकरणी माणगांव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. १४४/२०२३ भा. दं. वि. स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी नितिनकुमार पोंदकुळे व गोरेगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पी के घोडके हे करीत आहेत.



0 टिप्पण्या