बाळजाई स्पोर्ट्स नागावच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २७- माणगांव तालुक्यातील गोरेगाव विभागातील नागाव येथील बाळजाई स्पोर्ट्स संघ आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा दि. २३, २४ व २५ डिसेंबर रोजी डोळभैरी मैदान नागाव येथे पार पडल्या. या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळ्यास भाजप माणगांव तालुका सरचिटणीस युवराज मुंढे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र(नाना)महाले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाच्या आयोजनात बाळजाई स्पोर्ट्स संघाचे गणेश शिर्के, मनोज कासरेकर, विनोद कासरेकर, महेंद्र कासरेकर, भावेश मोरे, शरद कासरेकर, सचिन सत्वे, संकेत हाटे, दिनेश मोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
या तीन दिवसीय पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक भांदरे संघ, द्वितीय क्रमांक तळेगाव वाडी, तृतीय क्रमांक आंबर्ले संघ,बचतुर्थ क्रमांक भिंताड या संघांनी पारितोषिके पटकावली आहेत. मालिकावीर म्हणून अमित धसाडे, उत्कृष्ठ फलंदाज सनी जांबरे, उत्कृष्ट गोलंदाज साहिल धोंडगे यांनी पारितोषिके पटकावली आहेत.




0 टिप्पण्या