माणगांव शहर बाजारपेठेत आयडिया मोबाईल टॉवरला लागली आग.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव शहरात अनंत बिल्डिंगच्या टेरेसवर असणाऱ्या आयडिया कंपनीच्या रेंज टॉवरला दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ११:३० च्या दरम्यान अचानक आग लागल्याने माणगांव बाजारपेठेत एकच खळबळ माजली. यावेळी माणगांवचे दक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ लहांगे, पोलीस उपनिरीक्षक सतिश आस्वर, पो. शि.रामनाथ डोईफोडे, बीट मार्शल पोलीस भरत वामन यांच्यासह माणगांव पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर माणगांवचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक दिनेश रातवडकर शिवसेना नगरसेवक अजित तार्लेकर व बहुउद्देशीय आपत्कालीन वाहन व टीम दाखल झाली आणि १२:३० वाजेपर्यंत पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आग आटोक्यात नाही तर पूर्णपणे विझविण्यात आली. ही आग विझविण्यासाठी प्रथम:त माणगांव वाहतूक पोलीस शाखेचे पोलिस शिवराजे बांडे व पोलीस निवास साबळे यांनी सर्वप्रथम जाऊन टॉवरचे चालू असलेले इंजिन बँद केले. ही आग टॉवर वर असेलला कनेक्टर ने अचानक पेट घेतल्यामुळे शॉट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ह्या बिल्डिंग मधील आग जर आटोक्यात आली नसती तर त्याच बिल्डिंग मध्ये असणारे महावितरण कंपनीचे कार्यालय व त्याखाली असलेली माणगांव बँक ऑफ इंडिया शाखा यांचे कार्यालय आणि व्यावसायिक यांचे देखील मोठे नुकसान झाले असते. मात्र पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अनर्थ टळला आहे. यामूळे नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांचे माणगांव तालुक्यातुन कौतुक करण्यात येत आहे..



0 टिप्पण्या