नागाव व गोरेगावमध्ये माजी पंतप्रधान स्व: अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सुशासन दिन साजरा

 नागाव व गोरेगावमध्ये माजी पंतप्रधान स्व: अटलबिहारी वाजपेयी यांच्या  जयंती निमित्त सुशासन दिन साजरा


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव दि. २६- भारत देशाला अणुशक्ती संपन्न करणारे प्रखर वक्ते, प्रेरक कवी स्वतंत्र भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती दि. २४ डिसेंबर रोजी सुशासन दिन म्हणून  माणगांव  तालुक्यातील नागाव व गोरेगाव येथे साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी माणगांव तालुक्यातील गोरेगाव विभागातील  पदाधिकारी व बहुतांश विविध सेल, मोर्चा पदाधिकारी व भाजप कार्यकर्त्यांनी स्व अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले व पुष्पहार अर्पण केला.

 यावेळी मनोगत व्यक्त करताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र(नाना)महाले व भाजप तालुका सरचिटणीस युवराज मुंढे  म्हणाले की,"कदम मिलाकर चलना होगा"! ह्या अटलजींच्या काव्यपंक्ती वर आधारून आपण चालले पाहिजे. अटलजींचे स्वप्न मोदी जी पूर्णत्वास नेत आहेत.  आज आपली अर्थव्यवस्था पहिल्या ५ क्रमांकामध्ये येऊन ठाकली आहे. १९९८ मध्ये अटलजींनी जमिनीखाली केलेल्या ५ अणू चाचण्या आजही देशाला आठवतात कारण ह्या चाचण्या अमेरिकेला व इतर विकसित राष्ट्रांना हादरवून टाकणाऱ्या व भारताचा जागतिक सत्ता म्हणून उदय होत असल्याचा जगाला संदेश देणाऱ्या होत्या. या प्रयोगाने पाकिस्तान ला देखील हादरवून सोडले होते. यानंतर अटलजींचे परराष्ट्र धोरण, त्यानंतर "मेरी इक्यावन कविताये" ह्या भारतीय नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत असे मत भाजप जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र (नाना )महाले, माणगांव तालुका  सरचिटणीस युवराज मुंढे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

 गोरेगाव विभागात  झालेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष  भालचंद्र (नाना )महाले, माणगांव तालुका सरचिटणीस युवराज मुंढे, तालुका उपाध्यक्ष अशोक यादव, नागाव उपसरपंच अक्षय माने, गोरेगाव शहर अध्यक्ष किशोर रातवडकर, उपशहर अध्यक्ष प्रसाद महाडिक, युवा मोर्चा चिटणीस सुरज जाधव, चिटणीस महेंद्र कासरेकर, घनश्याम भोईर, विरन भोईर, तेजेश भोईर, नितेश मोरे, सचिन कासरेकर, निलेश राशीनकर, विनू कासरेकर, नितेश मोरे, उमेश जाधव, दिपक कासरेकर आदी उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या