माणगांवमध्ये माजी पंतप्रधान स्व: अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.

 माणगांवमध्ये  माजी पंतप्रधान स्व: अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.

पोलीस प्रवाह न्यूज 

   माणगांव : दि. २५ - भारत देशाला अणुशक्ती संपन्न करणारे प्रखर वक्ते ,प्रेरक कवी स्वतंत्र भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती २४ डिसेंबर रोजी माणगांव तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी माणगांव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व बहुतांश विविध सेल,मोर्चा पदाधिकारी व भाजप कार्यकर्त्यांनी स्व अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले व पुष्पहार अर्पण केला.

      यावेळी मनोगत व्यक्त करताना भाजप माणगांव तालुका अध्यक्ष उमेश साटम  व भाजप तालुका सं. सरचिटणीस गोविंद कासार म्हणाले की,"कदम मिलाकर चलना होगा"! ह्या अटलजींच्या काव्यपंक्ती वर आधारून आपण चालले पाहिजे. अटलजींचे स्वप्न मोदी जी पूर्णत्वास नेत आहेत.आज आपली अर्थव्यवस्था पहिल्या ५ क्रमांकामध्ये येऊन ठाकली आहे.१९९८ मध्ये अटलजींनी जमिनीखाली केलेल्या ५ अणू चाचण्या आजही देशाला आठवतात कारण ह्या चाचण्या अमेरिकेला व इतर विकसित राष्ट्रांना हादरवून टाकणाऱ्या व भारताचा जागतिक सत्ता म्हणून उदय होत असल्याचा जगाला संदेश देणाऱ्या होत्या.या प्रयोगाने पाकिस्तान ला देखील हादरवून सोडले होते,यानंतर अटलजींचे परराष्ट्र धोरण, त्यानंतर "मेरी इक्यावन कविताये" ह्या भारतीय नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत असे मत भाजप तालुका अध्यक्ष उमेश साटम व संघटन सरचिटणीस गोविंद कासार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

      भाजप माणगांव कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमासाठी भाजप माणगांव तालुका अध्यक्ष उमेश साटम, तालुका संघटन सरचिटणीस गोविंद कासार यांच्यासह तालुका उपाध्यक्ष योगेश पालकर,माणगांव शहर अध्यक्ष नितिन दसवते,भाजप द.रायगड लोकसभा विस्तारक रमेश ढेबे, खरवली विभाग अध्यक्ष जयदीप करडे,गोरेगाव विभाग अध्यक्ष किशोर पवार, संदीप म्हाप्रळकर, अमित कोंडे,नितेश आडीत आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या