माणगाव सापडले १३ लाख रुपयांची स्फोटके; ३ आरोपी गजा आड.

 माणगांव पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी १३ लाख रुपयांची स्फोटके केली जप्त.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची पत्रकार परिषदेतून माहिती.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. २४ -  माणगांव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून २३ डिसेंबर रोजी जप्त केलेल्या स्फोटके यांच्या बाबतीत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माणगांव पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत बोलताना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की,गोपनिय माहीती मिळाल्याने सदर गुन्हयात एकुण ३ आरोपीत यांना अटक करण्यात आलेले असुन त्याचे नावे १) विक्रम गोपाळदास जाट २) विठ्ठल तुकाराम राठोड ३) राजेश सुभेसिंग यादव यांना  व एक पीक अप टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

    माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  सपोनि सतीश आस्वर, पोसई गायकवाड, पोसई आघाव, पोह जाधव, पो शि.ढाकणे, पोशि,.वामन, पोशि बोरकर यांचे पथक तयार करुन सदरच्या  पथका कडून माणगाव निजामपुर रोडवर कारवाई करण्याकरीता रवाना केले. २३ डिसेंबर रोजी सकाळी पांढरा रंगाचा बोलेरो कंपनीचा पीक अप टेम्पो  एम एच १२ एस एफ ४३२२ हे संशयीत वाहन दिसुन आल्यानंतर  पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदरचे संशयीत वाहन थांबवून वाहनातील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव विक्रम गोपाळदास जाट वय २६ वर्षे रा. जाट मोहल्ला, हनुमान मंदीराजवळ, बच्छााखेडा ता. शहापुर जि. भिलवाडा, राज्यस्थान सध्या रा. सचिन आटपाटकर याचें घरी, समर्थ कॉम्प्रेसर, घोटावडे गाव, ता. मुळशी, जि. पुणे असे सांगीतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी गाडीमध्ये ९०,८००/-किमतीचे एकुण ४ बॉक्स इलेक्टीक डिटोनेटर,१०,००,०००/- कंमतीचा पाढरा रंगाचा बोलेरो कंपनीचा टेम्पो क्र एमएच १२ एस.एफ. ४३२२ असा एकुण १२,५८,८००/-किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.१,७०,०००/- किमतीचे जिलेटीन कांडयांचे ५० बॉक्स त्याचेकडे अधिक चौकशी केली असता तो  स्फोटक पदार्थ ज्याच्याकडे परवाना नाही त्यांना विकत असल्याचे समजले.

      तसेच पाली व पेण येथुन दोन आरोपीत यांना अटक करून आरोपीत अनुक्रमे १ याचे कडे १५९ किलो वजनाचे व अनुक्रमांक २ याचेकडे १८० किलो वजनाचे असे एकुण १५५९ किलो वजनाचे जिलेटीन व १४.४० बॉक्स डेटोनिटर एकुण किलो ३५० ते ४०० किलो वजनाचे असे स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. या वरून माणगांव पोलीस ठाणे येथे  कॉ.गु.र.नं. ३७१/२०२३ भा.द.वि.सं.कलम २८६.३४ सह बारीपदार्थ अधिनियम १९८४ चे कलम १ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर  पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोदकुले यांचे अधिपत्याखाली माणगांव पोलीसनिरीक्षक  राजेंद्र पाटील, सपोनि सतीश आस्वर, पोसई गायकवाड, पोसई आघाव, पोह जाधव, पोह पवार, पोह किरण तुणतणे, पोशि विकास ढाकणे, पोशि वामन, पोशि दहीफळे यांनी पार पाडली आहे.या पत्रकार परिषदे साठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सह उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार पौदकुळे, माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ लहंगे, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर,पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील,पोलीस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आघाव हे उपस्थित होते.

       या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक यांनी अनेक विषयांवर वार्तालाप केला त्यावेळी माणगांव तालुका आणि मुंबई गोवा हायवेवरील वाहतूक कोंडी व खोपोली पुणे जुना हायवेवरील वाहतुक कोंडीच्या समस्येवर निराकरण या पत्रकार परिषदेत केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या