निजामपूर विभागातील क्रूझर रुग्णवाहिका कुणीतरी शोधून द्या रे!- संदीपशेठ जाधव

 निजामपूर विभागातील क्रूझर रुग्णवाहिका कुणीतरी शोधून द्या रे!-   संदीपशेठ जाधव




निजामपूर विभागाची राष्ट्रवादी काँग्रेसची रुग्णवाहिका झाली गायब.

विभाग अध्यक्ष संदीप जाधव यांचे रुग्णवाहिका शोधून काढण्याचे आवाहन

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २०- माणगांव तालुक्यातील निजामपुर विभागात मागील २ ते अडीच वर्षापूर्वी खा. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर शहरात प्रसाद गुरव व अन्य नेते यांच्या राष्ट्रवादी काँगेस प्रवेश कार्यक्रमादरम्यान सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान निजामपूर यांना क्रूझर रुग्णवाहिका देण्यात आली होती. मात्र गेल्या १४ महिन्यापासून ही रुग्णवाहिका गायब आहे, असे मत निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

१४ महिन्यापूर्वी निजामपूर विभागातील राजकीय नेतृत्व दत्तू शेट पवार यांचा मुलगा रामदास पवार यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांना घेण्यासाठी ही रुग्णवाहिका माणगांव येथे आली असता माणगांव काळ नदी पुलाजवळ आली असता ह्या रुग्णवाहिकेचा अपघात किरकोळ अपघात झाला होता. त्या दिवसापासून ही रुग्णवाहिका गायब असल्याचे संदीप जाधव यांनी सांगितले आहे. तसेच या रुग्णवाहिकेबाबत संदीप जाधव यांनी वारंवार प्रसाद गुरव यांच्याशी विचारणा केली असता गाडी आज येईल,  येईल असे सांगण्यात येत आहे. याबाबत संदीप जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.


निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष संदिप जाधव यावेळी म्हणाले की, निजामपूर विभागातुन पुणे दिघी महामार्ग जातो. शनिवार रविवार तसेच इतर सुट्ट्याच्या दिवशी या भागात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यावेळी कोणत्याही प्रसंगी अपघात झाला तर रुग्णवाहिका सहजा -सहजी उपलब्ध होत नाही. हाच प्रसंग संदीप जाधव यांच्या मुलाच्या अपघाता दरम्यान ओढावली. मात्र ईश्वर कृपेने त्याच मार्गावरून त्यावेळी माणगांवची रुग्णवाहिका जात असल्याने त्या रूग्णवाहिकेमुळे संदीप जाधव यांच्या मुलाला माणगांव येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र ही परिस्थिती सर्वसामान्य नागरिकावर ओढवल्यास काय करायचे? असा सवाल देखील संदीप जाधव यांनी उपस्थित केला आहे. खासदार तटकरे यांनी रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका दिली. पण गेली १४ महिने रुग्णवाहिका गायब कुणी केली? असा सवाल निजामपूर विभागातील नागरिक देखील उपस्थित करत आहेत. तर खासदार साहेबांनी दिलेली रुग्णवाहिका कुणी तरी शोधून द्या असे अवाहन निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी केले आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या