युवराज मुंढे यांची माणगांव तालुका भाजप सरचिटणीसपदी फेरनिवड.
माणगांव-दि. ६- तालुक्यातील गोरेगाव विभागातील भारतीय जनता पार्टीचे तरुण उमदे व खंदे नेतृत्व युवकांचे स्फूर्ती-स्थान युवराज मुंढे यांची माणगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस पदी पुनश्च निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण, भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, लोकसभा प्रमुख सतिश धारप यांच्या आदेशानुसार युवराज मुंढे यांची माणगांव तालुका सरचिटणीस पदी फेरनिवड करण्यात आली आहे.
माणगांव तालुका आणि गोरेगाव विभागात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात युवराज मुंढे हे नेहमी अग्रस्थानी राहीले आहेत. तसेच पक्ष संघटना वाढीसाठी तळमळीने काम करणारा कार्यकर्ता म्हणून युवराज मुंढे यांची ओळख आहे. ना. रविंद्र चव्हाण, आ. प्रविण दरेकर, आ. प्रशांत ठाकूर, माजी आ.धैर्यशील पाटील तसेच भाजप नेत्या चित्राताई वाघ यांचे खंदे समर्थक म्हणून देखील युवराज मुंढे यांची ओळख आहे. त्यांनी सन २०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केले. त्यानंतरच्या राजकीय प्रवासात त्यांनी वेगवेगळी पदे त्यामध्ये गोरेगाव शहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष तालुका सरचिटणीस अशी पदे भूषविली आहेत. त्यांनी २०१७ साली गोरेगाव विभागातुन पंचायत समिती निवडणूक देखील लढविली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या तळमळीने काम करणाऱ्या या कार्यकर्त्याची कामाची दखल घेत पक्ष नेतृत्वाकडून त्यांची तालुका सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हामुणकर, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र(नाना) महाले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, माणगांव तालुका अध्यक्ष उमेश साटम, तालुका उपाध्यक्ष अशोक यादव व भारतीय जनता पार्टी च्या विविध मोर्चे व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.



0 टिप्पण्या