माणगांव उपअधीक्षक भूमी अभिलेख पदी नरेश नागोठकर
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. ८- माणगांव उपअधीक्षक भूमी अभिलेख पदी नरेश नागोठकर यांची नेमणूक झाली आहे. गेली अनेक महिने हे पद रिक्त होते. त्यामूळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली होती. सदर कामे लवकरच मार्गी लावून नागरिकांना सर्व कामे नियमित करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन आदेश दिनांक- ४/१२/२०२३ नूसार राजपत्रित अधिकारी म्हणून उपअधीक्षक भूमी अभिलेख माणगांव तालुका जिल्हा रायगड या पदावर नरेश नागोठकर पदोन्नती देण्यात आलेली आहे.



0 टिप्पण्या