नवरंग (Indian Pitta) पक्षाची हुबेहूब रांगोळी काढत उधळले रंग आनंदाचे : दिवाळी स्पेशल
पत्रकार रविंद्र कुवेसकर यांनी छंद जोपासत दिवाळीत साकारली नवरंग पक्षाची हुबेहूब रांगोळी
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. १५ -माणगांवमधील रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार , माणगाव तालुका पत्रकार सेवा संघ चे मार्गदर्शक रविंद्र कुवेसकर यांनी दिवाळी निमित्त सर्व साधारण रंगाचा वापर करुनआपल्या घरी काढलेली ही रांगोळी विशेष आकर्षण ठरत आहे. एवढं काय आहे या रांगोळीत तर.. त्यांचा मुलगा वन्यजीव अभ्यासक शंतनुने टिपलेल्या नवरंग (Indian Pitta) या पक्षाच्या छायाचित्राचीच साकारलेली हुबेहूब रांगोळी. मुक्तपणे रंग उधळत काढलेली ही रांगोळी सगळ्यांच्या पसंतीत उतरत आहे.
बरेच वर्ष रांगोळी हाती घेतलेली नसताना देखील रविवारी १२नोव्हेंबर नरक चतर्दशीच्या व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या आईच्या आग्रहाखातर शुभ-लाभ आणि पणती अशी साधी रांगोळी काढून आपल्या वयाची साठी पार केलेल्या या कलाकाराच्या हातातील रंगाची जादू कायम असल्याचे त्याला कळले आपल्यातील ही कला कायम असल्याचे पाहत सोमवार दिनांक १३ नोव्हेंबरला ही कला जोपासत, या कलेशी एकरूप होत या ६० वर्षाच्या तरुणाने दुपारी ३ वाजण्याचे सुमारास रांगोळी काढण्यास सुरुवात केली. साधारण ६ वाजेपर्यंत म्हणजे तीन तासात एकाग्रतने नवरंग म्हणजेच इंग्रजीमध्ये इंडीयन पिट्टा या पक्षाची रांगोळी साकारली. रांगोळी अशी झाली की जणू हा नवरंग पक्षी आपल्या कडे पाहतो आहे असे वाटते.
स्थानिक पातळीवरच्या घटनांची समिक्षा करणारे, निर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे रायगडचे रत्न रविंद्र कुवेसकर यांनी प्रत्येकाकडे काही ना काही कला असतेच आणि ती जोपासताना या कलेशी एकरूप झाल्यास वय काहीही असो आपण आपला छंद चांगल्या प्रकारे जोपासल्यास तो आनंद आणि समाधान मिळवून देतो हे सांगितले.





0 टिप्पण्या