मयुरेश मुकुंद बापट ने साकारली पावनखिंडीची हुबेहूब प्रतिकृती

मयुरेश मुकुंद बापट ने साकारली पावनखिंडीची हुबेहूब प्रतिकृती 

पोलीस प्रवाह न्यूज 

दि. १३ - दिवाळी सणामध्ये माणगांव शहरातील सरलादेवी मंगल कार्यालयाच्या शेजारी राहणाऱ्या युवक मयुरेश मुकुंद बापट याने पावनखिंडीची हुबेहूब प्रतिकृती आपल्या घराच्या आंगणात साकारली आहे. दिवाळीत किल्ल्यांच्या माध्यमातून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आजच्या पिढीसमोर ठेवण्याच्या हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही मयुरेशने पुढाकार घेतला आहे.

  पावनखिंड प्रतिकृती बनवण्यासाठी मयुरेशला १० दिवस लागले असून त्यात पुठ्ठे, लाल काळी माती, लाकूड, विटा, दगड अश्या वस्तूंचा वापर केला आहे. यामध्ये वीर शिवा काशीद यांची पालखी, घोडखिंडीतील युद्ध तसेच शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यावर बाजीप्रभूंसाठी दिलेले तोफांचे बार असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. विशेषबाब म्हणजे पावनखिंडीतील युद्ध दाखवणारे हालते पुतळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे तसेच रात्रीच्या अंधारात केलेल्या विद्युत रोषणाईमुळे हि पावनखिंड सध्या येण्या-जाणाऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या