पोलीस प्रवाह दिवाळी अंक प्रकाशनाचे औचित्याने कर्तव्यदक्ष पोलीस व सेवाभावी व्यक्तींचा सत्कार
माणगांव- दि. ११- पोलीस प्रवाहच्या वतिने माणगांव पोलीस ठाण्यात "संघर्षगाथा" दिवाळी अंक २०२३ चे प्रकाशन व सत्कार सोहळा शनिवार दि.११ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या प्रसंगी पोलीस व सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करणाऱ्या पत्रकारांच्या या अनोख्या स्नेह-बंधाचा सोहळा खात्यात आपण पहिल्यांदाच अनुभवला असल्याचे पोलीस उपअधिक्षक नितीनकुमार पोंदकुले यांनी सांगताना येथील सर्व पोलीस व पत्रकार, विशेषत: पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचे कार्याचे खास कौतुक केले.
यंदाच्या वर्षी कर्तव्यदक्ष, सहाय्यक पोलीस निरिक्षक सतिश आस्वर, लेडी सिंघम अर्थात पोलीस उप-निरिक्षक अस्मिता पाटील व पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे तसेच माणगाव शहरातील शून्यातून अस्तित्व निर्माण करणारे सेवाभावी उद्योगरत्न संतोष साळुंखे आणि आपल्या लेखनीतुन सामाजिक सेवा करणारे युवा पत्रकार वैभव सत्वे या चार सत्कारमुर्तीना सन्मानित करण्यात आले.
या छोटेखानी सोहळ्याचे सुत्र-संचलन खास शैलीत "रायगड भूषण" पत्रकार, रविंद्र कुवेसकर यांनी केले. या प्रसंगी पोलीस प्रवाह क्रियाशील सदस्य उपसंपादक/वृत्तसंपादक पत्रकार परेश शिंदे, मा. ता. पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष प्रमोद जाधव, सुनिल राजभर, राम भोस्तेकर, नचिकेत म्हापसेकर, निरंजन कळस आणि पोलीस उपनिरिक्षक गायकवाड व इतर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे मान्यवर उपस्थित होते.







0 टिप्पण्या