माणगाव तालुक्यात आदिवासी रूढी प्रथे अंतर्गत आदिवासी विवाह सोहळा संपन्न.
माणगांव-दि. ११- आदिवासी समाज हा या भारत देशाचा मुळ मालक आहे. आदिवासी समाज रूढी प्रथेनुसार आपलं जीवन जगत असुन निसर्गास मानतो म्हणून त्याला निसर्गपूजक असे संबोधले जाते. आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले नाते हे कधीही न तुटणारे आहे. रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने कातकरी, ठाकर, डोंगर कोळी, महादेव कोळी या जमाती वास्तव्यास असलेल्या आढळून येतात. त्यातील कातकरी जमात ही आदिवासी राहिली नसून आदिवासी कोण? याची व्याप्ती पहिली तर बोगस आदिवासी आहे.
केंद्र शासनाने युनोला लेखी कळविले आहे की, भारतात आदिवासी नाहीत. त्याची बातमी २०१७ मध्ये एका वर्तमानपत्रात आलेली आहे. त्यात केंद्र शासनाने युनो ला असं का कळविले याबाबत सविस्तर माहिती दिलेली असुन त्यानुसार सन १९५० पूर्वी आदिवासी समाज हा स्वतःच्या चाली रीती परंपरेनुसार जगत होता. परंतु कालांतराने आदिवासी मधील जमातीनी बिगर आदिवासी संस्कृती म्हणजेच (हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध ) संस्कृतीस जवळीक साधल्याने या जमाती आदिवासी न राहता बोगस आदिवासी म्हणून आज ओळखल्या जातात. आदिवासी जमाती या ख्रिश्चन हिंदू, मुस्लिम, बौद्ध संस्कृतीतील देव, सण-वार साजरे करत असल्याने त्यांचा आदिवासी संस्कृतीशी काहीही काडीमात्र संबंध राहिला नाही.
आजमितीस आदिवासीमधील कातकरी जमात ही आदिवासी असताना हिंदू कायद्यानुसार कार्यपद्धती वापरत असल्याचे दिसून येते.जन्म मृत्यू ची परंपरा, विवाह पद्धत, सणवार करणे, हिंदू वारसा कायदा वापर करणे वैगेरे अश्या पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. आदिवासी समाजाची लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात असुन त्यातील कातकरी जमाती आदिवासी लग्नाची पद्धत अनुसरत नाही. हिंदू विवाह कायदा १९५५ मधील कलम २( २)(१) नुसार हिंदू विवाह कायदा आदिवासी समाजास लागू नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. तरीही हिंदू विवाह पद्धतीने लग्नाचे कार्यक्रम उरकले जातात. काही ठिकाणी मुला मुलीचे वय साधारणत : १२,१३, १४,१५ असे असते. अशावेळेस बालविवाह कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. अशा घटना देखील घडल्या आहेत. मुळात आदिवासींवर भारतीय दंड संहिता (ipc)१८६० व सी आर पी सी (१९७३) मधील कलम (५) नुसार कारवाई करता येत नाही तरीही गुन्हे दाखल होत असतात.
या सर्व बाबीचा अभ्यास करून माणगाव तालुक्यातील काही आदिवासी कातकरी कार्यकर्त्यांनी आदिवासी विवाह पद्धतीने माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात प्रथमत लग्न लावून दिले ते देखील अवघ्या २० हजार रुपयात. असे पाहिले तर हिंदू विवाह पद्धतीने लग्नाकरीता साधारणतः दीड ते २ लाख रुपये खर्च होत असतो. यामध्ये काही आदिवासी तर उसनवारीने पैसे काढून खर्च करत असतात. असे होऊ नये याकरिता आदिवासी पद्धतीने कमी खर्चात लग्न लावून त्या गरीब कातकरी कुटुंबाना मदत केली. तसेच यापुढे त्यानी आदिवासी कुटुंबाना आदिवासी पद्धतीने लग्न लावण्याचे अवाहन सुद्धा केले आहे. व जय जोहार जय आदिवासी आदिवासी रूढी प्रथा चालवा आदिवासी वाचवा असा नारा दिला आहे.



0 टिप्पण्या