हिंदुस्थान पेट्रोलियम रायगड विभाग समाजातील दुर्बल घटकासाठी काम करणार -पावस श्रीवास्तव
माणगांव-दि. ४- माणगांव येथील मोर्बा रोड या ठिकाणी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून तालुक्यातील दहा शाळेतील विद्यार्थ्यांना 3 नोव्हेंबर रोजी वह्या वाटप कार्यक्रमानिमित हिंदुस्थान पेट्रोलियमचे डीजीएम पावस श्रीवास्तव रायगड विभाग समाजातील दुर्बल घटकासाठी काम करणार असून पुढील कालावधीत पीडित असलेल्या कॅन्सर ग्रस्त तसेच अनाथ वयोवृद्ध यांच्या करिता सुद्धा काम करणार आहोत. आपण कमाविलेल्या हिश्यातून समाजासाठी काही तरी दान करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सुद्धा हे कार्य हाती घेतले आहे असे उपस्थित विद्यार्थी व शिक्षक वर्गाला संबोधित केले.
हा कार्यक्रम रोहित पारधे यांच्या हिंदुस्थान पेट्रोल पंप या ठिकाणी घेतला होता. यावेळी वह्या वाटप कार्यक्रमासाठी राजिप शाळा विहुले, पन्हळघर बु., पन्हळघर खु., राजिप शाळा पहेल, दत्तनगर, राजिप शाळा साई, मुगवली, राजिप शाळा पानोसे, लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर साई, नॅशनल इंग्लिश स्कुल दहिवली, भोस्तेकर विद्यालय दहिवली या शाळेतील व शिक्षक वर्ग उपस्थित होता. एकूण 650 विद्यार्त्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
ग्रीन एनर्जी पेट्रोल पंपचे मालक आकाश नरसिंघांनी यांनी मुलांना खाऊ देऊन विशेष सहकार्य केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित पारधे व हेमंत सिंग यांनी मेहनत घेतली. तसेच सेल्स ऑफिसर नदीम आलम व सिनियर डीलर्स अशोक लुधानी, हेमंत सिंह, राजेश ठाकूर, बाळा शेठ, भरत राय, विवेक कोकणे, नितीन शितोळे,लोखंडे, समीर गालसुरकर, सचिन शेडगे, दीपक हिवाले, देशमुख, रोहित पारधे यांचे सुद्धा सहकार्य मिळाले.



0 टिप्पण्या