शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश

 शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १५- शेतकरी कामगार पक्षाचे दहिवली कोंड येथील शेकाप कार्यकर्ते राजेंद्र गाडे यांनी आपल्या समर्थक ग्रामस्थ्यासह माणगाव येथे भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष युवानेते निलेश थोरे भाजपा उपजिल्हाध्यक्ष नाना महाले, तालुका अध्यक्ष उमेश साटम, लोकसभा विस्तारक रमेश ढेबे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महेश सुर्वे, सरचिटणीस गोविंद कासार, नगरसेविका ममता थोरे,नदहिवली कोंड ग्रा. पं सदस्य योगेश पालकर, आनंद राजभर, रितेश निवाते, नीलम काळे, कौस्तुभ वझे, परेश सांगले, ज्ञानेश्वर मराठे, मंदार मढवी, अभिजित मोने यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

 प्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष उमेश साटम यांनी सांगितले कि, आपण ज्या विकासाच्या हेतूने पक्षामध्ये आलेला आहात त्या आपल्या सगळ्या इच्छा भाजपा तर्फे पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पक्षातर्फे करण्यात येईल. त्याचप्रमाणे विविध विकासकामे करून माणगाव तालुक्यात भाजपा वेगाने वाढवण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले कि, आजचा पक्षप्रवेश हा विभागाला दिशा देणारा असून भाजपाच्या माध्यमातूम आज देशभरात जलजीवन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, लेक लाडकी योजना, आयुष्यमान भारत कार्ड अशा अनेक लोकपयोगी योजनांच्या माध्यमातून राष्ट्रहिताचे कार्य खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील भाजपा सरकार करत आहे. महाराष्ट्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व कोकणामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये कधी नव्हे एवढी विकासाची कामे चालू आहेत. पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रमुख  सतीश धारप यांच्या नेतृत्वामध्ये  जिल्हाध्यक्ष मा. आ. धैर्यशील पाटील यांच्या रुपाने रायगड लोकसभेला भाजपाचाच खासदार निवडून आणण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत. त्यामुळे भविष्यात रायगड जिल्हा परिषदेवरही भाजपाचाच झेंडा फडकवण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहिले पाहिजे. येणारी जिल्हा परिषद निवडणूक ही संपूर्ण बहुमताने निवडून आणण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागणे गरजेचे आहे. प्रसंगी नानासाहेब महाले यांनी पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून भविष्यात दहिवली कोंड गावाला निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मराठे यांनी केले तर नव्यानेच रायगड लोकसभा विस्तारक म्हणून नेमणूक झालेले रमेश ढेबे यांचा परिचय व सन्मान पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आला. 

  प्रसंगी राजेंद्र गाडे, विठ्ठल पालकर, योगेश पालकर, दत्ताराम गाडे, पांडुरंग वडेकर, राज पालकर, भोलेनाथ वडेकर, कृष्णा पालकर, बालोजी पालकर, सुरेंद्र पालकर, प्रज्योत वडेकर, नथुराम पालकर, रोहन पालकर,-रुपेश पालकर, पांडुरंग पालकर, यशवंत पालकर, अक्षय पालकर, नथुराम गाडे, प्रमोद पालकर, प्रतीक पालकर, विजेंद्र गाडे, रोशन शिंदे, सुनील गाडे, समीर गाडे, सुनीता पालकर, शुभांगी पालकर, प्रगती गाडे, कविता वडेकर, राजेश्री गाडे, मंदा गाडे, मंगला गाडे व इतर कार्यकर्त्यांनी शेकापला रामराम करून भाजपचा झेंडा हाती घेतला. तसेच  जिग्नेश पाडुरंग ताम्हणकर रा. पेण तर्फे तळे व  ढालघर येथील सतीश पवार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या