माणगांवमधील यावर्षी एकता नगरचा नवदुर्गा नवरात्रौत्सव उत्साहात.
माणगांव-दि. १७- माणगांव शहरातील एकतानगरमध्ये विविध विभागातुन एकत्र येऊन रहिवासी झालेले नागरिक एकोप्याने वास्तव्यास आहेत. अशा एकतेच्या लोकवस्तीमध्ये सार्वजनिक सण उत्सव मोठया उत्साहात साजरे होत असतात. त्याचप्रमाणे यावर्षी नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ एकता नगरच्या वतीने संयोजिका सुवर्णा रुपेश जाधव व उद्योजक रुपेश जाधव यांच्या प्रेरणेने या वर्षी २०२३ चा नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
दिनांक १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या दरम्यान एकता नगर येथील सुवर्णा जाधव यांच्या निवासस्थानासमोरील मैदानात यावर्षी गरबा नृत्य व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उत्सवाला माणगांव तालुक्यातील राजकिय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.
तसेच यावर्षी या नवदुर्गा नवरात्र उत्सवाचे प्रथम वर्ष आहे. समाजात एकता निर्माण राहावी, सामाजिक सलोखा राहावा याकरिता आम्ही या उत्सवाचे आयोजन केले आहे. तरी उत्सवात माणगांव शहरातील नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन मंडळाचे सदस्य देवेंद्र (पप्या) सुर्वे यांनी केले आहे.



0 टिप्पण्या