मांजरोणे येथील बेपत्ता ८३ वर्षीय बाळू कांबळे यांचा सखोल तपास व्हावा- माजी सभापती प्रकाश लाड यांची मागणी

 मांजरोणे येथील बेपत्ता ८३ वर्षीय बाळू कांबळे यांचा सखोल तपास व्हावा- माजी सभापती प्रकाश लाड यांची मागणी

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १५- माणगांव तालुक्यातील साई विभागांतुन मांजरोणे गावातील ८३ वर्षीय वृद्ध व्यक्ती बाळू सोनू कांबळे हे दि. २६ मे २०२२ पासून मौजे साई येथील बस स्टॉप वरून बेपत्ता झाले आहेत. त्याबाबत माणगांव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे येथे मीसिंग केस क्रं १६/२०२२ प्रमाणे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. बाळू कांबळे हे सधन किंव्हा वतनदार नाहीत एक सर्वसामान्य कुटुंबातील जेष्ठ नागरिक आहेत. मात्र ते बेपत्ता झाल्यापासून त्यांचा कुठेही तपास न लागल्याने शासकीय कामात येणाऱ्या अडचणी सांगण्यासाठी त्यांचा मुलगा मुलगी व कुटुंबिय यांनी मांजरोणे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माणगांव पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश लाड यांना जाऊन आपल्या व्यथा ऐकवल्या.

 बाळू सोनू कांबळे हे बेपत्ता झाले त्यानंतर त्यांचे पश्चात कुटुंबिय नातेवाईक आणि त्यांचे वारसदार यांना त्यांच्या बेपत्ता झाल्यानंतर दाखल तक्रारीनुसार कोणतीही सबळ माहिती समोर येत नाही की ते सापडले किंव्हा मृत आहेत. त्यांच्या मुली आणि मुलगे आणि त्यांचे वारसदार यांना सरकारी महसूली दप्तरी आणि शैक्षणिक बाबींसाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरी तपास यंत्रणेने आपली सूत्रे जलद गतीने हलवून तपास करावा अन्यथा ह्या अडचणीतुन कोणत्याही प्रकारचा सुवर्णमध्य काढत सर्वसामान्य कांबळे परिवाराला सध्या शासकीय कामात भेडसावणाऱ्या अडचणींचे निराकरण करावे, अशी मागणी करत असल्याचे माजी सभापती प्रकाश लाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या