माणगांवमध्ये भाजप युवा मोर्चा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 माणगांवमध्ये भाजप युवा मोर्चा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २- भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युवानेते निलेश थोरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असलेल्या सेवा पंधरवाडाचे औचित्य साधून सरलादेवी मंगल कार्यालय, माणगाव येथे  साई ब्लड बँक एमजीएम हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी रक्तदान करून उस्फुर्त प्रतिसाद दिला.

रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब महाले, तालुका सरचिटणीस युवराज मुंढे, नगरसेविका ममता थोरे, उपाध्यक्ष अशोक यादव, अश्विनी महाडिक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रितेश निवाते, दहिवली ग्रामपंचायत सदस्य योगेश पालकर, उ.भा. सेल अध्यक्ष आनंद राजभर, भाजपा कार्यकर्ते राकेश जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष राजू तेटगुरे, विद्यार्थी संघटन जिल्हा संपर्कप्रमुख वैभव कुलकर्णी, प्रियांका मेहता, नीलम काळे, कौस्तुभ वझे, गोडबोले, परेश सांगले, शुभम धूपकर, प्रदीप लांगे, आकाश मढवी, निलेश राशीनकर, मंदार मढवी, अभिजित मोने, ओमकार गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 यावेळी युवानेते निलेश थोरे यांनी सांगितले कि, रक्तदान हे श्रेष्ठदान असून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधीजी जयंती पर्यंत सेवा पंधरवडा आयोजित केला जातो. ज्यामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, आयुष्यमान भारत कार्ड असे अनेक लोकपयोगी कार्यक्रम राबवले जातात. त्याच पार्श्वभूमीवर माणगावमध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून सदरचे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिराला माणगाव तालुक्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानतो. व शिबिरासाठी नवरात्र मित्र मंडळाने विशेष सहकार्य केले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या