सुभाष सोसायटी चेअरमन पदी शितल सिताराम दसवते यांची बिनविरोध निवड

 सुभाष सोसायटी चेअरमन पदी शितल सिताराम दसवते यांची बिनविरोध निवड

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ३- सुभाष विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड खरवली चेअरमन पदी मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी शेकाप जेष्ठ नेते अस्लम राऊत, शिवसेना तालुका प्रमुख ऍड. महेंद्र मानकर, तालुका चिटणीस रमेश मोरे, शिवसेना श्रीवर्धन विधानसभा संघटक ऍड. सुशिल दसवते, समाजसेवक संतोष खडतर, कृ. उ. बा. स. संचालक स्वप्निल दसवते, माजी उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, सागर मोरे, संजय पंदेरे सखाराम जाधव, मधुकर अर्बन, संतोष सकपाळ, विलास मोरे, सदानंद लहाने, रमेश बक्कम, अमोल मोहिते, योगेश मोरे, सखाराम शिंदे, राजेश कासारे, नथुराम आडीत, सुभाष अर्बन, दिपक तांबट, राकेश पातेरे, बळीराम खडतर, राज आडीत, संतोष सुतार, उत्तम कासारे, जगदीश बक्कम, दिलीप उतेकर, बंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सदरील निवडणूक प्राधिकृत अधिकारी अमोल निरडे यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. यावेळी शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितले की, राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या खरवली गावात सुभाष सोसायटी असून माजी चेअरमन अंबूर्ले यांच्या अधिपत्याखाली सुभाष सोसायटीमध्ये अंधाधुत कारभार चालू होता. गोरगरीब जनतेला योग्य तो न्याय मिळत नव्हता. त्यामुळे अंबूर्ले यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर शितल सिताराम दसवते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेला न्याय मिळवून देण्याचा व जनतेची काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. कै. सिताराम दसवते यांनी माणगांव तालुक्यात शेकाप माध्यमातून केलेले समाज कार्य नेहमी लक्षात राहण्यासारखे असून त्यातून युवा पिढीला प्रेरणा मिळत आहे. खरवली ग्राम पंचायत निवडणूक येत्या काही दिवसांत होणार असून सुभाष सोसायटी निवडणूक ही त्याची नांदी असल्याची माहिती स्वप्निल दसवते यांनी दिली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या