माणगांव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी ; माणगांव पोलीसांनी केले मोलाचे सहकार्य

 माणगांव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी ; माणगांव पोलीसांनी केले मोलाचे सहकार्य 

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव : दि. १ - पनवेलजवळ एक मालगाडी रुळावरून खाली घसरल्याची घटना शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी घडली होती.  मालगाडीचे ५ ते ६ बोग्या रुळावरून खाली उतरल्या होत्या. सदरील अपघात हा कळंबोली ते पनवेल रेल्वे स्थानका दरम्यान घडला होता. त्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेवर यांचा परिमाण झाला. रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी कोकण रेल्वे पुर्णतः बंद असल्याने माणगांव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती.

    अपघातानंतर सेवा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याने कोकण रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात आला होता. त्यात वीकेंड व दि. २ ऑक्टोबर गांधी जयंती असल्याने प्रवाशांची एकच गर्दी माणगांव रेल्वे स्थानकावर झाली होती. परंतु दुपार पर्यत काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले होते. सकाळपासून प्रवाशी रेल्वे स्थानकात ताटकळत बसले होते. तसेच रेल्वे स्थानका बाहेरील मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. तेवढ्यात माणगांव पोलीसानी मोलाचे सहकार्य केले. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. नवनाथ लहांगे, पो. शि. राम डोईफोडे, मयूर पाटील, राकेश सानप, गणेश समेळ पोलीस टीम रेल्वे स्थानकात दाखल झाली. त्यांनी प्रवाशांना समजावून माणगांव डेपो येथे संपर्क साधून ६ मोफत एस टी बस उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या समवेत तहसीलदार विकास गारुडकडर देखील रेल्वे स्थानक येथे उपस्थित होते. तसेच माणगांवकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांना बसवून वाहतूककोंडी देखील सोडविले. त्यांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे प्रवाशांना होणार त्रास कमी झाला. त्यामुळे प्रवाशांनाकडून माणगांव पोलीसांचे कौतुक करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या