भुवन ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे उमेदवार दिपकशेठ जाधव यांना वाढता पाठिंबा.

 भुवन ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे उमेदवार दिपकशेठ जाधव यांना वाढता पाठिंबा.

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि.- १९- माणगांव तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे "भुवन "ग्रामपंचायत. भुवन ग्रामपंचायत म्हटली की, माणगांव तालुक्याची हद्द समाप्त मात्र या भुवन ग्रामपंचायत वर खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. मागील पाच वर्षे राष्ट्रवादी काँगेसच्या दिशा दिपक जाधव यांनी सरपंच पद भूषविले आहे. सद्या माणगांव तालुक्यातील दि. ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या २६ ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये 'भुवन" ग्रामपंचायत देखील समाविष्ट आहे. यामध्ये भुवन, घोटवळ, विठ्ठलनगर अशा ३ गावांची ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायत मधून जनतेतुन थेट सरपंच पदाचे उमेदवार दिपक श्रीराम जाधव हे आहेत. दिपक शेठ जाधव यांना विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने सामजिक व राजकीय वारसा असलेल्या सरपंच पदाचे उमेदवार दिपक जाधव यांना भुवन ग्रामपंचायत मध्ये वाढता पाठींबा मिळत असल्याचे चित्र आहे.

सामजिक, राजकीय, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात इंदापूर विभागात आपला ठसा उमटवणारे दिपक जाधव हे खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदितीताई तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून देखील कार्यरत आहेत. मागील पाच वर्षांच्या काळात खासदार सुनिल तटकरे, तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे, विधानपरिषद आ. अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून भुवन ग्रामपंचायत मध्ये विकासाची गंगा आलेली आहे. त्यामूळे मतदारराजा मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला नाही. भुवन असेल किंव्हा विठ्ठलनगर किंव्हा घोटवळ असेल या प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत, असे मत सरपंच पदाचे उमेदवार दिपक श्रीराम जाधव यांनी व्यक्त केले आहे.

ह्या ग्रामपंचायत मधील २ प्रभागांची सदस्य पदांची निवडणूक बिनविरोध झाली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (खा. तटकरे) गटाचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित प्रभागांमध्ये देखील सर्व च्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य व सरपंच निवडून येणार अशी ग्वाही दिपकशेठ जाधव यांनी दिली आहे. भुवन ग्रामपंचायत हद्दीतील मतदार हा विकासपुरुष खासदार तटकरे यांना मानणारा मतदार असल्याने ह्या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा वर्चस्व राखणार व आमचे सरपंच दिपकशेठ जाधवच होणार अशी चर्चा इंदापूर विभागात नाक्या-नाक्यावर रंगल्याचे दिसून येत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या