शिवसेना शेकाप युतीतर्फे खरवली गृ. ग्रा. पं. निवडणूक नामनिर्देशन अर्ज दाखल

 शिवसेना शेकाप युतीतर्फे खरवली गृ. ग्रा. पं. निवडणूक नामनिर्देशन अर्ज दाखल

संतोष रघुनाथ खडतर सरपंच पदाचे प्रबळ दावेदार

पोलीस प्रवाह न्यूज

 तालुक्यातील २६ ग्राम पंचायत निवडणुकीतचे बिगुल वाजले असून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तालुक्यात राजकियदृष्ट्या महत्वाची असलेल्या ग्रुप ग्राम पंचायत खरवली निवडणूकीमध्ये शिवसेना (शिंदे गट) व शेतकरी कामगार पक्षातर्फे दि. १९ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशित अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये सरपंच पदासाठी अर्ज दाखल केलेले संतोष रघुनाथ खडतर हे सरपंच पदाचे प्रबळ दावेदार ठरणार आहेत.

खरवली ग्रुप ग्राम पंचायतमध्ये खरवली, खरवली बौद्धवाडी, उमरोली, चेरवली, आदिवासीवाडी या गाव व वाड्यांचा समावेश असून एकूण ९ सदस्य व १ थेट सरपंच अशी आकडेवारी आहे. यामध्ये ३ प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून ३ उमेदवार ग्राम पंचायतीवर निवडुन जाणार आहेत. शिवसेना शेकाप युतीकडून प्रभाग क्र. १ मध्ये निशा नथुराम आडीत, योगेश शिर्के, चंद्रा संजय जगताप, प्रभाग क्र. २ मध्ये सुजित भागोजी सकपाळ, किमया किरण मुंढे, सुनीता दिपक शिंदे तर प्रभाग क्र. ३ मध्ये कल्पेश यशवंत मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्र. ३ मधून शिवसेना शेकाप युतीतर्फे फक्त एकच अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी शेकाप जेष्ठ नेते अस्लम राऊत, शिवसेना तालूका प्रमुख ऍड. महेंद्र मानकर, शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे, श्रीवर्धन विधानसभा संघटक ऍड. सुशील दसवते, बाजार समिती संचालक स्वप्निल दसवते, संतोष सकपाळ, दिपक तांबट, विलास मोरे, विनोद सुतार, बापू शिंदे, नारायण मुंढे, विलास मोंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 खरवली ग्राम पंचायतमध्ये गेली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. परंतु, संतोष खडतर यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने त्यांनी केलेले समाजकार्य, विकासकामे व जनसंपर्क पाहता यावेळी खरवली ग्राम पंचायतमध्ये सत्तातर होईल अशी चर्चा ऐकावयास मिळत आहेत. सदरील निवडणूक शिवसेना तालुका प्रमुख ऍड. महेंद्र मानकर, शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे, ऍड. सुशील दसवते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शेकाप एकत्रितपणे लढणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या