भुवन ग्रामपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे सरपंच,सदस्य यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल
राष्ट्रवादी पक्षामार्फत झालेल्या विकास कामांच्या जोरावर आमचा विजय निश्चित : काका नवगणे
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १८- तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाच्या अशा ओळखल्या जाणाऱ्या भुवन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत गेली १५ वर्षांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरपंचासह सर्व जागावर विजय संपादन करेल असा विश्वास इंदापूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष काका नवगणे यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना सांगितले.
येणाऱ्या दि. ५ नोव्हेंबर रोजी माणगाव तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाच्या अशा ओळखल्या जाणाऱ्या भुवन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या भुवन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शेखरशेठ देशमुख, इंदापूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष काका नवगणेयांच्या विशेष उपस्थितीत सरपंच व सदस्य उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज बुधवार दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी दाखल करण्यात आले. भुवन ग्रामपंचायतीत जनतेतून थेट सरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिपक श्रीराम जाधव यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भुवन, विठ्ठलवाडी, घोटवळ या तीन गावांची मिळून भुवन ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विठ्ठलवाडी व भुवन येथील प्रत्येकी तीन अशा ६ जागांची निवडणूक बिनविरोध झाली असून निवडून आलेले सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून घोटवळ गावात तीन जागांसाठी निवडणूक लागली असल्याचे सरपंच पदाचे उमेदवार दिपकशेठ जाधव यांनी सांगून या सर्व उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांच्याकडे दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. भुवन ग्रामपंचायत हद्दीत दिपक जाधव यांना मानणारा जेष्ठ व तरुण वर्ग मोठा असल्याने त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. भुवन ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे थेट जनतेतून सरपंच पदासाठी दिपक जाधव व सदस्य सहकारी उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखरशेठ देशमुख, काका नवगणे , अविनाश मांडवकर, उदय अधिकारी, बाळा खातू, मेघनाथ सातपुते, तरुण मराठी उद्योजक सुभाष दळवी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भुवन ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या