कोल्हापूर कासार गल्लीत पाच सोनार दुकानात चोरी

 कोल्हापूर  कासार गल्लीत पाच सोनार दुकानात चोरी

पोलीस प्रवाह न्यूज

कोल्हापूर-दि. ३०-  शहरातील गुजरी परिसरात कासार गल्लीतील एका इमारतीच्या तळमजल्यावर पाच बंगाली कारागीरांची सोने आटणीची दुकाने आहेत. ही पाचही दुकाने शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यानी  फोडली.अज्ञातांनी  सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने लंपास केलेत.

कासार गल्लीतील एका इमारतीच्या तळमजल्यावर बंगाली कारागीरांची ८ दुकाने आहेत. ही दुकाने  कारागीरांनी काम आटोपल्यानंतर शुक्रवारी रात्री बंद केली होती.शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास  बुरखा घातलेल्या अज्ञात चोरट्याने तळमजल्याकडे जाणाऱ्या  प्रवेशद्वाराचे  कुलुप तोडून तळमजल्यावर प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी   एका पाठोपाठ एक अशी सलग पाच दुकाने फोडली.

या प्रकरणी बाबुराव पांडुरंग कारेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, प्रशिक्षणार्थी  पोलिस उपअधीक्षक रविंद्र भोसले, पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी  घटनास्थळी भेट देऊन चोरी झालेल्या दुकानांची पाहणी केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या