माणगांव पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे आनंदी वातावरणात विसर्जन.

 माणगांव पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे आनंदी वातावरणात विसर्जन.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. २९ -  "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" उक्ती जोपासत "खाकी वर्दी" समाज रक्षणासाठी नेहमी तत्पर असते.देशाच्या सीमेवर आपले सैनिक आपले रक्षण करतात आणि समाजात होणाऱ्या विघातक कृतींपासून "पोलीस" आपले रक्षण करतात.अश्या ड्युटीमध्ये असताना त्यांना सण वार परिवार काही नसतो का? सर्व असते तरी देखील माणगांव तालुक्यातील नागरिक म्हणतात "रस्त्यावर उभा आहे माणूस खाकी वर्दीतला म्हणुन सण साजरा होतोय गर्दीतला..!" यावर्षी गणेशोत्सव २०२३ मधील माणगाव शहरात शून्य वाहतूक कोंडी याचे श्रेय कुणाला जात असेल तर ते माणगांव पोलिसांच्या सुयोग्य नियोजनाच..!अश्या खाकी वर्दीच्या  म्हणजे गेले अनेक वर्षाची परंपरा असलेल्या माणगांव पोलीस ठाण्याच्या बाप्पाला यावर्षी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी काळ नदीवरील माणगांव नगरपंचायत सार्वजनिक गणेश विसर्जन घाट येथे आनंदी वातावरणात निरोप देण्यात आला.

    गणेश चतुर्थी ला स्थापना झालेल्या घरगुती गणेशोत्सवातील बाप्पाला पूजनाच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन हे अनंत चतुर्थी च्या दिवशी केले जाते.मात्र यावेळेस ही खाकी वर्दी बंदोबस्त मध्ये असते यामुळे पोलिसांचे बाप्पा विसर्जन अनंत चतुर्थी च्या दुसऱ्या दिवशीच होते.यावर्षी २०२३ च्या माणगांव पोलीस ठाण्याच्या बाप्पाची विसर्जन मिरवणुक माणगाव पोलीस ठाणे ते कचेरी रोड मुंबई गॊवा हायवे ते माणगांव नगरपंचायत च्या सार्वजनिक गणपती विसर्जन घाट अशी ढोल ताशांचा गजरात लेझीम च्या ठेक्यावर काढण्यात आली.

      माणगांव पोलीस ठाण्याच्या ह्या गणेश विसर्जन मिरवणुकीत माणगांव पोलीस उपविभागीय अधिकारी नितीनकुमार पोंदकुळे,माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,माणगांव पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी आनंदाने सहभागी झाले होते.माणगांव नगरपंचायत च्या वतीने गणेश विसर्जन घाटावर बाप्पा जाण्यापूर्वी माणगांव पोलीस ठाणे गणेशोत्सवाचे मानकरी पोलीस उपविभागीय अधिकारी,पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अधिकारी,सर्व कर्मचारी यांचा माणगांव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी, माणगांव नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या हस्ते सत्कार व स्वागत समारंभ करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या