समाजाचा सामाजिक कॉमन सेन्स हरवतोय- हभप. संतोष महाराज पायगुडे
पोलीस प्रवाह न्यूज
हिंजवडी : दि. ६ - हल्ली लोकांचा सार्वजनिक व सामाजिक जीवनात वागण्याचा कॉमनसेन्स हरवत चालला आहे. लोकं फार हितसाधु झाली. नातेवाईक, शेजारी, समाज किंवा राष्ट्राचे कोणाला काही देणे राहिले नाही. केवळ कामाशी काम एवढेच काय ते चाकोरीबद्ध जीवन प्रत्येकाचे झाले आहे. या सर्वांचाvभावी पिढीवर अनिष्ट परिणाम होत आहे. अशी खंत हभप. संतोष महाराज पायगुडे यांनी नेरे, दत्तवाडी येथे व्यक्त केली.
श्री तुळजा भवानी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजित व्याख्यानमालेत कीर्तनकार संतोष महाराज माणसांचे सार्वजनिक, सामाजिक जीवनात वागणयाचे सामान्य व्यवहारज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने तरुण व ग्रामस्थांनी पाल्यांसह गर्दी केली होती. पुढे ते म्हणाले, एखाद्या अंत्यविधिला जाऊन काही महाभाग मोठ्याने हसतात, मोठ्याने फोनवर बोलतात म्हणजेच दुःखाच्या क्षणी सेन्स नाही. पण, प्रत्येकाने स्वतःपासून सामान्य व्यवहारज्ञान पालनास सुरुवात केल्यास एक दिवस समाजाला हरवलेला कॉमनसेन्स नक्की सापडेल.
प्रतिष्ठान राबवित असलेल्या समाज उद्बोधक उपक्रमांची समाजाला खरी गरज असून अशा कार्यक्रमांच्या आयोजनांतून समाज सुधारण्याचे काम व्हावेे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुस्तक देऊन मान्यवरांचा सन्मान झाला. यावेळी हभप. बळवंत जाधव, पांडुरंग दातीर, विलास जाधव, माऊली जाधव, रामदास पायगुडे, सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. नवनाथ जाधव, गोरक्षनाथ जाधव, संदीप साने, विनोद जाधव, संजीवनी गोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदिप जाधव व माजी आदर्श सरपंच दिपाली जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले. पसायदान आणि शिववंदनेने सांगता झाली.



0 टिप्पण्या