शाहिदा तुपे यांच्यावरील अन्यायाचा सातारा आर पी आय (A) कडून जाहीर निषेध
सातारा-दि.- ३-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने पानवळ तालुका माण येथील महिला शाहिदा तुपे यांना अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ महाराष्ट्र प्रदेश संघटक कैलास जोगदंड, महाराष्ट्र सचिव अशोक ससाणे, सातारा जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ तात्या धोत्रे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे(डॅडी), सातारा जिल्हा सरचिटणीस राज चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाआंबेडकर गटाचे खटाव तालुका गटनेते अतुल घोणे, सातारा जिल्हा सचिव किरण बगाडे, सातारा जिल्हा युवक सचिव अनिल उमापे, आरटीसीएलची सातारा जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रशांत सर्वगोड, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिवचरण सांगली जिल्हा अध्यक्ष रिपाई आंबेडकर गटाचे कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन भोताजी, खंडाळा तालुका अध्यक्ष पवन धायगुडे, खटाव तालुका उपाध्यक्ष विजय बनसोडे, माण तालुका अध्यक्ष सनी खरात, महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष दामीताई निंबाळकर, माण तालुका अध्यक्षा निशा खरात, खटाव तालुकाध्यक्ष उषा जाधव, रायगड जिल्हा गटनेते जयदास मालोरे, तुषार साळुंखे, काजल सानप, सुप्रिया येवले, सुनीता जगताप, वंदना कटे, उज्वला सगरे मॅडम आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शाहिदा तुपे यांना भेट देताना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार म्हणाले की, आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण खुला श्वास घेतो. संविधान धोक्यात आहे महिलांना अमानुषपणे कोणीही मारणे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अशा समाजकंटांना रिपब्लिकन पार्टी आपल्या पध्दतीने चोख उत्तर देईल.! आम्ही या घटनेचा रिपब्लिकन पार्टी आंबेडकर गटाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. तर यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब म्हणाले शहिदाताई आम्ही तुझे भाऊ आहोत. येथून पुढे तुझ्यावर अन्याय होणार नाही असे आम्ही रिपाई तर्फे ग्वाही देतो व यावेळी सर्व राज्यस्तरीय आर पी आय (A)च्या पदाधिकाऱ्यांनी शहीदा ताई तुपे यांच्याकडून राखी बांधून घेतली व त्यांना रक्षणाचे वचन दिले.





0 टिप्पण्या