माणगांवात पोक्सो सलग दुसरा गुन्हा दाखल

 माणगांवात पोक्सो सलग दुसरा  गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीची झाली प्रसूती

 प्रशासनाकडून किशोरवयीन मुलामुलींमध्ये जनजागृतीची गरज

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २९- माणगांव तालुक्यात एकाच आठवड्यात पोक्सो  अंतर्गत दुसरा  गुन्हा दाखल झाल्याची दुसरी घटना घडली असून अल्पवयीन मुलीची प्रसूती देखील झाली आहे. असे प्रकार माणगांवमध्ये वारंवार घडत आहेत. याबाबात  प्रशासनाकडून अल्पवयीन मुले मुली किशोरवयीन मुलं आणि मुलींमध्ये अशा प्रवृतीविरोधी जनजागृती होणे गरजेचे आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, डिसेंबर २०२२ मध्ये आरोपी भावेश राजाराम यादव, वय २३ वर्ष, रा. चाच याने पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असूनही स्वतःच्या राहत्या घरामध्ये पीडित मुलीला बोलावून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेऊन त्यात पीडित गरोदर राहून दि. २८ सप्टेंबर रोजी तिची प्रसूती झाली.

या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास  उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुले, पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. सतिष आस्वर करीत आहेत. अशा गुन्ह्याविरोधात कडक कारवाई होऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी माणगांव तालुक्यातून जोर धरू लागली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या