साके गावात बाप्पांचे भक्तिभावाने जल्लोषात स्वागत.
पारंपरिक वाद्यांसाहित गणपती बाप्पांचे आगमन
म्हसोबा देवस्थान कमिटीकडुन सर्व मंडळाचा सन्मान
पोलीस प्रवाह न्युज
कोल्हापुर : विनायक सातूसे दि. १९ - साके ता.कागल येथे गणेश चतुर्थीला सकाळ पासुनच बाप्पांची मुर्ती आणण्यासाठी मंडळांची लगबग चालु होती.बालचमुंचा उत्साह आणि मंडळ कार्यकर्त्यांची तयारी उत्स्फूर्तपणे चालु होती.ह्यावर्षी जवळपास १६ मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पांचे आगमन करण्यात आले.ह्या मध्ये धनगरी-ढोल,लेझीम,ढोल-ताशे,घुमके,टाळ मृदंगासाहित भजन करत गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत मुर्ती प्रतिष्ठापणा करण्यात आली.
आगमन सोहळ्यासाठी गावच्या स्वागत कमानी जवळच म्हसोबा देवस्थान कमिटीच्या वतीने येणाऱ्या सर्व मंडळांच्या अध्यक्षांचा मानाची शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तर येणाऱ्या सर्व भाविकांना अल्पोपहाराची सोय देखील केली होती.ह्यावेळी विश्वनाथ पाटील,तानाजी भु.पाटील,अरुण पाटील,पंडित पाटील,सुनिल पाटील,संभाजी आ.पाटील,अरुण पाटील इ.कार्यकर्ते उपस्थित होते.त्याबरोबर गावातील सर्व तरुण जेष्ठ आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभागी घेत बाप्पांचे आगमन करण्यात आले.



0 टिप्पण्या